अखेर अजित पवारांनी केला शरद पवार यांना फोन, म्हणाले...
माय नगर वेब टीम
मुंबई - राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार
यांनी शुक्रवारी आमदारकीचा राजीनामा देत खळबळ उडवून दिली. त्यानंतर ते अज्ञातवासात असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र आता अजित पवार यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना फोन केला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
अजित पवार यांनी फोनवरून शरद पवारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मला तुम्हाला भेटायचे आहे, असे शरद पवारांना सांगितले. त्यावर शरद पवारांनी मुंबईत भेटू असे कळवल्याची माहिती सांगण्यात येत आहे. त्यामुळे लवकरच अजित पवार व शरद पवार या काका-पुतण्याची भेट होणार आहे. त्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधणार असल्याची माहिती अकुंश काकडे यांनी माध्यमांना दिला आहे.
Post a Comment