इंदुरीकर महाराज निवडणूक लढवणार? संगमनेरात बसले मुख्यमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून



माय नगर वेब टीम
अहमदनगर - राज्यातील घराघरात आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मनामनात पोहचलेले प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर महाराज विधानसभा निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. संगमनेरात पोहोचलेल्या भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांशी हितगूज साधणारे इंदुरीकर महाराज भाजपच्या तिकिटावर थेट कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांविरोधात निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे.

सोशल मीडिया असो की जाहीर कीर्तन आघाडीवर नाव असलेले नाव म्हणजे निवृत्ती महाराज इंदुरीकर... महाराज म्हणे राजकारणात उतरणार आहेत? हो अशीच जोरदार चर्चा नगर जिल्ह्यात सुरू झाली आहे. आता हेच बघा ना.. शुक्रवारी भाजपची महाजनादेश यात्रा थोरातांचा बालेकिल्ला असलेल्या संगमनेरात पोहोचली होती. इंदुरीकर महाराज मुख्यमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले दिसले. बराचवेळ दोघांमध्ये हितगुजही झाले. पण त्यामुळे मात्र सगळीकडे वेगळीच कुजबूज सुरू झाली आहे. इंदोरीकर महाराज संगमनेरमधून थेट बाळासाहेब थोरातांच्या विरोधात निवडणुक लढवणारस अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मात्र, याबाबत इंदुरीकर महाराज यांनी कोणताही दुजोरा देण्यात आला. तरी धार्मिक संप्रदायातील लोक या गोष्टीच समर्थन करताना दिसत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post