अहमदनगर महोत्सव श्री किताबचा राज बागवान मानकरीमाय नगर वेब टीम
अहमदनगर - अहमदनगर डिस्ट्रिक बॉडीबिल्डिंग व फिटनेस असोसिएशनच्या मान्यतेने तर भोला हेल्थ क्लब व सप्लीमेंटच्या वतीने नुकतीच घेण्यात आलेली अहमदनगर महोत्सव श्री 2019 शरीर सौष्ठव स्पर्धा उत्साहात पार पडली. शरीर सौष्ठवपटूंनी केलेल्या पिळदार शरीरयष्टीच्या प्रदर्शनाने प्रेक्षकवर्ग भारावले. या स्पर्धेत जिल्ह्यातील शरीरसौष्ठवपटूंचा उत्सफुर्त सहभाग लाभला. यामध्ये अहमदनगर महोत्सव श्रीचा किताब नगरच्या राज (सुफियान) बागवान याने पटकाविला. तर भोला फिटनेस श्री चा मान किरण पटकुळे, सय्यद बुर्‍हाण श्री चा मान सद्दाम शेख तसेच हर्क्युलेस श्री चा मान जहीर शेख यांनी मिळवला. मोस्ट इम्प्रुमेंट शहेबाज शेख व बेस्ट पोझर तय्यब शेख ठरले. यावेळी इंटरनॅशनल बॉडी बिल्डर विशाल कांबळे व महेश गोसावी यांनी बॉडी शो करुन नवोदीत खेळाडूंना मार्गदर्शन केले.
विजेत्या शरीरसौष्ठवपटूंना 1972 चे प्रथम अहमदनगर श्री बुर्‍हाण सय्यद व पुणे येथील गोल्डमॅन वाल्मिक अण्णा कुटे यांच्या हस्ते रोख रक्कम, ट्रॉफी, मानाचा बेल्ट व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी भोला हेल्थ क्लबचे संचालक तथा स्पर्धेचे आयोजक जावेद सय्यद, शहा फैसल सय्यद, रजा सय्यद, जावेद शेख, अय्याज बागवान, मुजफ्फर शेख, मुन्नवर दारुवाला, शोएब शेख, किरण देशमुख, शाहरुख सय्यद, बबलू शेख, रमीज शेख, सलमान खान, गौस शेख, अशकान शेख, शहानवाझ शेख, आरिफ पठाण, बोबो सय्यद, अक्षय केंजरला आदी उपस्थित होते.
सदर शरीरसौष्ठव स्पर्धा बारातोटी कारंजा, माळीवाडा येथील मराठा मंगल कार्यालयात पार पडली. सहा वजनी गटात झालेल्या या स्पर्धेतील प्रत्येकी वजन गटातील पहिल्या पाच विजेत्यांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते बक्षिस देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेचे परिक्षण राष्ट्रीय परिक्षक माजी प्राचार्य डॉ. जयंत गीते, महेश सातपुते, विक्रम भोगाडे, दत्ता रणसिंग, अ‍ॅड. नाना रोकडे, संजय सुरवसे, नाना गवळी, अभय हलवाई, केतन देशमुख, जेम्स ससाणे, तौसिफ शेख, सागर येवले, अर्जुन जावळे, नितीन पारखे, लेडीज फिटनेसच्या अध्यक्ष विश्रांती आढाव, अंकित गीते, मयूर गीते यांनी केले.
बुर्‍हाण सय्यद म्हणाले की, सदृढ शरीर हीच मनुष्याची खरी संपत्ती असून, निरोगी शरीरासाठी व्यायाम महत्त्वाचा आहे. युवकांनी व्यायामाकडे लक्ष केंद्रित केल्यास व्यसनाधिनता कमी होणार आहे. पुर्वी सकस आहारातून प्रोटीनची गरज भागायची. मात्र सध्या रायसायनिक खतांच्या अतिरेक वापराने अन्नातून पुरेश्या प्रमाणात प्रोटीन मिळत नसून, बॉडी बिल्डर्सना सप्लीमेंटची गरज भासत आहे. याचा वापर योग्य मार्गदर्शनाखाली होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. गोल्डमॅन वाल्मिक अण्णा कुटे यांनी ग्रामीण भागातील युवकांमध्ये व्यायामाची आवड निर्माण करण्याकरिता भोला हेल्थ क्लब व सप्लीमेंटच्या वतीने दरवर्षी घेण्यात येणार्‍या शरीर सौष्ठव स्पर्धेचे कौतुक केले. भोला हेल्थ सप्लीमेंटच्या वतीने स्पर्धेतील सर्व सहभागी बॉडी बिल्डर्सना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व प्रोटीनचे डबे भेट देण्यात आले.  

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post