वाळू तस्करांना प्रशासनाचा दणका




माय नगर वेब टीम
अहमदनगर - श्रीगोंदा तालुक्यातील अजनूज, आर्वी, गार या शिवारातील भीमा नदीच्या परिसरातील वाळू तस्करांना पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. नदीपात्रातील पाण्यातून यांत्रीक बोटीव्दारे वाळू उपसा करणाऱ्या सुमारे २५ लाखांच्या ६ यांत्रीक बोटी महसूल व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने फोडल्या.
याबाबत सव्सितर असे की,श्रीगोंदा तालुक्यातील अजनूज,आर्वी,गार या शिवारातील भीमा नदीच्या परिसरातील भीमा नदीपात्रातून काहीजण अवैधपणे यांत्रीक बोटीव्दारे मोठ्या प्रमाणात वाळूउपसा करत असल्याची माहिती गुप्त बातमीदाराने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना दिली. या माहितीच्या आधारे पवार यांनी त्यांच्या पथकातील गुन्हे शाखेचे पोहेकॉ.विजयकुमार वेठेकर,पोना.रवींद्र कर्डिले,रोहित मिसाळ,बाळू पालवे,विश्वास बेरड,कमलेश पाथरूड,मच्छिंद्र बर्डे,संदीप दरंदले,सागर ससाणे व चालक पोहेकॉ.संभाजी कोतकर आदींसह श्रीगोंद्याचे तहसीदार महेंद्र माळी यांच्या पथकातील अधिकारी व कर्मचारी यांची वेगवेगळी पथके तयार करून अजनूज,आर्वी, गार गावाच्या शिवारात सदरच्या छापा टाकला. यावेळी तेथे काहीजण यांत्रीक बोटीच्या साह्याने वाळूउपसा करत असल्याचे आढळून आले.पोलिस पथक आल्याचे पाहून हे सर्वजण बोटी सोडून पळून गेले.याबाबत अधिक चौकशी केली असता, त्यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही.

नदीपात्रात वाळू उपसा करणाऱ्या तीन फायबर व तीन लोखंडी अशा सहा बोटी आढळून आल्या. त्या पथकाने ताब्यात घेवून जिलेटिनच्या साह्याने स्फोटाव्दारे उडवून दिल्या. ही कारवाई पोलिस अधीक्षक ईशू सिंधु,अपर पोलिस अधीक्षक सागर पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली केली.



वाळूची चोरटी वाहतूक करणारा ट्रक पकडलाकाटवन खंडोबा रोड परिसरातून वाळूची चोरटी वाहतूक करणारा ट्रक स्थानिक गुन्हे शाखेने पकडला. काल सायंकाळी केलेल्या कारवाईत पोलिसांनी टाटा कंपनीचा ट्रक व दोन ब्रास वाळू जप्त केली आहे.
 याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात रवी संजय बर्डे (वय 23) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, काटवन खंडोबा रोड परिसरातून वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे मिळाली होती. त्यावरून पोलिसांच्या पथकाने सायंकाळी सहा वाजता काटवण खंडोबा रोडवरील गाझीनगर येथे दोन ब्रास वाळूसह टाटा कंपनीचा ट्रक (क्र. एमएच 04, ईबी 7265) जप्त केल. या कारवाई 4 लाख 20 हदार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचारी रवींद्र घुंगासे यांच्या फिर्यादीवरून रवी बर्डे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार ढगे हे करीत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post