आमचा 'नाद' करणारे 'बाद' होतील - रोहित पवार
माय नगर वेब टीम
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर पवार कुटुंबात गृहकलह असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यावर राष्ट्रवादीचे युवा नेते आणि अजित पवार यांचे पुतणे रोहित पवारांनी फेसबुकवर पोस्टद्वारे स्पष्टीकरण देत विरोधकांवर टीका केली आहे.
रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टवर लिहली आहे, पवार कुटुंबाला
कितीही त्रास देण्याचा प्रयत्न होऊ दे पण आमचं कुटुंब एवढं मजबूत आहे की, आमचा नाद करणारेच एकदिवस बाद होऊन जातील, मी मागे पण सांगितलं आहे की अजिबात कशाची काळजी करू नका, आपला गडी लै खंबीर हाय. समाजाप्रती जे आपलं कर्तव्य आहे ते पवार कुटुंबीय आजपर्यंत पार पाडत आलंच आहे आणि यापुढेही हे काम सुरूच राहील. असंच एकत्र राहूया आणि पवार साहेबांचे हात बळकट करूया. असे फेेेसबुक वरील पोस्टमध्ये म्हटल्या आहे.
Post a Comment