महापालिकेच्या 'त्या' अधिकाऱ्याची तडकाफडकी उचलबांगडी
माय नगर वेब टीम
अहमदनगर- महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांची तडकाफडकी बदली केली आहे. डॉ बोरगे यांना घनकचरा व्यवस्थापन विभागात धाडण्यात आले आहे. डॉक्टर बोरगे यांच्या विरोधात राष्ट्रवादी सह, काँग्रेस, शिवसेनेने आवाज उठवला होता.
डेंग्यू सदृश आजाराने वैदूवाडी येथे राहणारे महापालिकेचे कंत्राटी कामगार बाबाजी शिंदे मृत्यू प्रकरणात डॉ बोरगे वादग्रस्त ठरले होते. तसेच कंत्राटी कामगारांना डॉ. बोरगे यांनी महापालिके ऐवजी वैयक्तिक काम करण्यास भाग पडल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर होता. या प्रकरणाची उपायुक्त सुनील पवार यांनी चौकशी करून आपला अहवाल आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांना दिला होता. त्याच आधारावर ही बदली करण्यात आली. बदलीमुळे डॉ बोरगे यांना कमी दर्जाचे पद देण्यात आले आहे, ही शिक्षा मानली जाते. त्याच्या जागेवर डॉ सतीश राजूरकर यांना पदभार देण्यात आला आहे. दरम्यान यापूर्वी ही रक्तपेढी बाबत त्यांच्यावर गंभीर ठपका ठेवत निलंबनाची कारवाई झाली होती. त्यानंतर आता मोकाट कुत्रे प्रकरणात त्यांची आरोग्य विभागातून उचलबांगडी करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे मनपात खळबळ उडाली आहे.
Post a Comment