गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या... देवस्थानच्या 'या' बांधिलकीने नगरकर व्यक्त


माय नगर वेब टीम
अहमदनगर - दहा दिवसानंतर आपल्या लाडक्‍या बाप्पाला टाळ, मृदुंग, ढोल ताशांच्या निनादात निरोप देण्यात येत आहे. शहराचे ग्रामदैवत तसेच मानाच्या विशाल गणपतीचा रथ विसर्जन स्थळाकडे दिल्लीगेट येथून सायंकाळी सहा वाजता बाहेर पडला. यावेळी गणेशभक्तांनी एकच जल्लोष केला. गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या… असा एकच जयघोष यावेळी गणेशभक्तांनी केला. गणपती विसर्जनासाठी महापालिकेच्या वतीने व नागरिकांनी अनेक ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच विसर्जन मिरवणूक निर्विघ्न पार पडावी यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.




ग्रामदैवत श्री विशाल गणपतीची जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते विधिवत पूजा पार पडल्यानंतर गणपती मिरवणुकीला सुरुवात झाली. मानाच्या विशाल गणपती ची ठिकठिकाणी मनोभावे पूजा करून आरती करण्यात आली. मिरवणुकीत मानाच्या विशाल गणपतीचे विश्वस्त अभय आगरकर आणि पदाधिकारी,गणेशभक्त उपस्थित होते. दिल्लीगेट बाहेर यावेळी सामूहिक गणेश आरती झाली. गणेश भक्तांनी यात सहभाग घेतला होता. मानाच्या विशाल गणपतीसमोर तीन ढोल पथक होते. महिलांनी हिरव्या साड्या आणि भगवे फेटे घालून मराठी पारंपारिक गाण्यांवर मिरवणुकीत सहभाग घेतला होता, महिलांचा हा सहभाग लक्षवेधी ठरला.


घरगुती गणेश विसर्जन मिरणूकीसाठी बनवला अनंत दर्शन रथ

आज सर्वत्र गणेश विसर्जन मिरवणूक मोठा उत्साहात संपन्न होत आहे. शहरासह सावेडी उपनगरात सार्वजनिक गणेश मंडळांच्या मिरवणूकांना सुरवात झाली आहे. सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपती बाप्पाचे विसर्जन वाजता गाजत निघतात. मात्र, घरगुती गणपती बाप्पाची मिरवणूक वाजत गाजत काढण्यासाठी सावेडी येथील श्री. तालयोगी प्रतिष्ठान घरच्या बाप्पाचे विसर्जन अनंत दर्शन रथामध्ये तालयोगीच्या गजरात वाजत गाजत करत आहे.
तसेच शाडू माती पासून बनवलेल्या गणेश मूर्तीचे या रथातच विसर्जन करण्यात येणार आहे. यासाठी श्री. तालयोगी प्रतिष्ठानने मोठा रथ सजावला आहे.


गणपती विसर्जना दरम्यान वृदेश्वर घाटाजवळ एक युवक बुडाल्याची घटना घडली आहे. मात्र, अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे युवकास जीवदान मिळाले आहे.
वृदेश्वर घाटाजवळ आज सकाळी एक युवक बुडाल्याची घटना घडली. परंतु, अग्निशमन दलाचे जवान एकनाथ कुंभार, गणेश शिंदे आणि जीवरक्षक भास्कर सुर्वे, विकी खंडागळे, गणेश जाधव, मंगेश सुपेकर, चौगुले यांनी बुडणाऱ्या युवकास वाचविले.


विश्वस्तांची सामाजिक बांधिलकी
सामाजिक सहिष्णुता आज श्री महाविशाल माळीवाडा गणेशाची मिरवणूक विसर्जन वाजत गाजत बुरुडगल्ली मार्गे धरतीचौका कडे मार्गक्रमण करत असताना मुस्लिम समाजाचे प्रसिद्ध फळविक्रते हाजी सिकंदर भाई बागवान यांची अंत्ययात्रा बुरुडगल्ली चौकात पोहोचली. दोन्ही मिरवणुका एकाच वेळी आल्यावर तात्काळ श्री माळीवाडा विशाल गणपतीच्या पंच कमिटी ने आपली गणेश विसर्जन मिरवणूक तात्काळ धरतीचौकाच्या अलीकडे थांबवून हाजी सिकंदर भाई बागवान यांच्या अंत्य यात्रेस मार्ग मोकळा करून दिला. अंत्ययात्रा पुढे गेल्यावर आपली विसर्जन मिरवणूक सुरू केली. खरोखर सामाजिक बांधिलकी चे भान ठेवून मुस्लीम समाजाच्या अंत्ययात्रेस मार्ग करुन देणार्‍या श्री. विशाल गणेश माळीवाडा देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त पंचकमिटीचे तमाम नगरकरांकडून आभार व्यक्त केले जात आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post