माय नगर वेब टीम
नवी दिल्ली : मागील काही दिवसांमध्ये डॉक्टर्स आणि आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांवर हल्ला करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशा घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालय लवकरच यासाठी कायदा तयार करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या कायद्याच्या तरतुदीत डॉक्टर्स आणि आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांच्या विरोधात अजामिनपात्र गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. तर त्यांच्या सोबत असणाऱ्या व्यक्तींना 10 वर्षांचा कारावास आणि 10 लाखांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.कामावर असताना सरकारी डॉक्टर्स आणि आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांवर रुग्णांच्या नातेवाईकाकडून हल्ला करण्याच्या घटनेत मागील काही दिवसांपासून वाढ झाली आहे. दरम्यान, आता सरकारकडून तयार करण्यात येणाऱ्या कायद्यात हल्ला करणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्यानुसार हल्ला करणाऱ्यांना अजामिनपात्र गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तर त्यांच्या सोबत असणाऱ्या व्यक्तींना 10 वर्षांचा कारावास आणि 10 लाखांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. आरोग्य मंत्रालयाच्या हेल्थकेअर सर्व्हिस पर्सनल क्लिनीकल इस्टैब्लिशमेंट बिल 2019 अंतर्गत या कायद्याच्या मसूद्यासाठी सामान्य माणसांच्या सूचना येत्या दिवसात मागितल्या आहेत. दरम्यान, यापुर्वीच्या हिंसक घटनांसाठी 3 वर्षाची शिक्षा आणि 2 लाखांचा दंड असे शिक्षेचे स्वरूप होते तर आता यात वाढ होवून 10 वर्षाची शिक्षा आणि 10 लाखांचा दंड असे करण्यात आले आहे.
Post a Comment