नवी दिल्ली - माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या अचानक झालेल्या निधनाने अनेकांना धक्का बसला आहे. मृत्यूच्या तीन तास आधी त्यांनी केलेले ट्विट आता व्हायरल झाले आहे.
मोदी सरकारने आधी राज्यसभेत आणि त्यानंतर लोकसभेत कलम ३७० हटवणारे विधेयक संमत करुन घेतले. या बाबत सुषमा स्वराज यांनी हे ट्विट केले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे त्यांनी या ट्विटमध्ये आभार मानले आहेत. मी माझ्या आयुष्याच या दिवसाची वाट पाहात होते, असे त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले होते.
दरम्यान, संध्याकाळी छातीत दुखायला लागल्याने सुषमा स्वराज यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
Post a Comment