महाराष्ट्र कोणाची जहागिरी नाही, मुख्यमंत्री जनता ठरवेल - खा.अमोल कोल्हे



माय  नगर वेब टीम
अहमदनगर - भाजप-सेना यांच्या मुख्यमंत्री कोण व्हावा यासाठी वेगवेगळ्या यात्रा सुरु आहेत. मुख्यमंत्री जनतेला ठरवू द्या. महाराष्ट्र कोणाचीही जहागिरी नाही, असे मत राष्ट्रवादीचे शिरुर खासदार अमोल कोल्हे नगर येथे व्यक्त केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रा आज
अहमदनगर येथे होती. नगर येथील सभेेेत खा.कोल्हेे बोलत होते. त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

दुष्काळ आणि पूरग्रस्तांना मदत न करता मुख्यमंत्री आणि शिवसेनेकडून निवडणुकीसाठी यात्रा काढण्यात येत आहेत. सरकारने गेल्या पाच वर्षात काय काम केलं?? असा प्रश्न जनतेला पडला आहे, असं म्हणत कोल्हेंनी भाजपवर निशाणा साधला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post