शिवसेना उपनेते राठोड यांना जमीन मंजूर




माय नगर वेब टीम
अहमदनगर - बूट फेकल्याच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेले शिवसेना उपनेते अनिल राठोड यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 25 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्‍यावर हा जामीन दिला आहे.

बोल्हेगाव येथील रस्त्याच्या कामावरून झालेल्या आंदोलनावेळी शिवसैनिकांनी प्रभारी शहर अभियंता विलास सोनटक्के यांच्यावर महापालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्यासमोर बूट फेकून मारला होता. यावेळी अधिकाऱ्यांवर खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी राठोड यांनी चिथावणी दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. राठोड यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post