कलम 370 हटवल्यानंतर आता अमित शाह ‘हे’ ऐतिहासिक पाऊल उचलणार ?
माय नगर वेेेब टीम
नवी दिल्ली - कलम 370 हटवल्यानंतर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणखी एक ऐतिहासिक पाऊल उचलण्याच्या तयारीत आहेत. येत्या 15 ऑगस्टला अर्थात स्वातंत्र्यदिनाला गृहमंत्री अमित शाह श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा फडकावणार असल्याचे समजते. अमित शाह गुरुवारी श्रीनगरला भेट देणार आहेत, त्यासाठी सुरक्षेचे कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.
अमित शाह काश्मीर खोऱ्यात भेट देणार आहेत, पण या क्षणी भेटीची तारीख मीडियाला सांगता येणार नाही, अशी माहिती गृहमंत्रालयातील सूत्रांनी दिली. हा सुरक्षेचा मुद्दा आहे. भारत-पाकिस्तानमध्ये तणावाची स्थिती असल्याने गृहमंत्र्यांच्या काश्मीर भेटीबाबत आधीच सांगता येणार नाही, असं गृहमंत्रालयातील अधिकाऱ्याने सांगितलं.
Post a Comment