माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे निधन
माय नगर वेब टीम
नवी दिल्ली -
भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे निधन झाले आहे. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मंंगळवारी रात्री साडे दहाच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. येथे डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेऊन होते. परंतु उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Post a Comment