पैसे अन धमकी प्रकरणामुळे जि. प. च्या 'या' सदस्याने दिली बीडीओ, विस्तार अधिकारी व सभापती विरोधात तक्रार
जिल्हा परिषद सदस्या सौ उज्वला ठुबे यांची तक्रार
माय नगर वेब टीम
पारनेर
पारनेर तालुक्यातील पंचायत समितीचे बीडीओ, विस्तार अधिकारी व सभापती राहुल झावरे यांच्या विरोधात कान्हूर पठार जिल्हापरिषद सदस्या सौ. उज्वला ठुबे यांनी फिर्याद दाखल केली आहे.
पारनेर पंचायत समितीचे बीडीओ विशाल तनपुरे व विस्तार अधिकारी रवींद्र माळी हे नेहमीच कान्हूर पठार गटातील विविध योजनांच्या कामांचे प्रस्ताव जाणीवपूर्वक बाजूला ठेवून पैशाची मागणी करतात. तर सभापती राहुल झावरे हा आपल्या राजकीय बळाचा वापर करून जनतेची कामे जाणीवपूर्वक अडवून पती आझाद ठुबे याना मारहाण करण्याची धमकी देतात.
जिल्हा परिषदेच्या मीटिंगमध्ये सभापती राहुल झावरे यांनी कान्हूर पठार ग्रामपंचायतची लफडी बाहेर काढून गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली. याबाबत जिल्हा परिषदेला वेळोवेळी तक्रारी देऊनही कुठलीही कार्यवाही झालेली नसल्याचे सौ उजवला ठुबे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
ग्रामपंचायतचे काम सुरळीत असूनही खोट्या पुराव्यांच्या आधारे तनपुरे, माळी व राहुल झावरे १५००००रुपयांची मागणी करतात व पैसे न दिल्यास माझ्यासह पती व कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याची धमकी देतात. जिल्हा परिषद गटातील लाभार्थ्यांना कागदपत्रे गहाळ करून जाणीवपूर्वक वंचित ठेवतात. त्याबाबत प्रत्यक्ष व फोनवर चौकशी केली असता तनपुरे व माळी अर्वाच्य भाषेत बोलून अपमान करतात.
सौ ठुबे यांनी मी एक महिला असल्याने वरील इसम जाणीवपूर्वक राजकीय हेतूने प्रेरित होऊन मानसिकत्रास देतात, ३५३, ४२०, सह ३४ प्रमाणे गुन्हे दाखल करण्याची धमकी देतात, सरपंच व कार्यकर्ते यांना यापूर्वीही जाणीवपूर्वक त्रास दिलेला आहे तसेच जवाहर योजनेच्या लाभारथ्यांकडून प्रत्येकी ३०००० रु मागणी केलेली आहे अश्या प्रकारचे अनेक आरोप केलेले आहेत.
Post a Comment