'त्या' अधिकाऱ्याच्या जीवितास धोका - जिल्हा परिषद सदस्या विरोधात पोलिसात तक्रार
माय नगर वेब टीम
पारनेर -
पारनेेेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य आझाद ठुबे व कान्हुर पठारचे सरपंंच अलंकार ठुबे यांच्या कडून जीवितास धोका असल्यामुळे पारनेर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या कडे लेखी तक्रार केली आहे.
या मध्ये मी पदभार स्वीकारण्यापूर्वी पासून कान्हुर पठार ग्रामपंचायत येथील विविध विकासकामातील गैरप्रकाराबाबत चौकशी व कोर्ट केस सुरु आहेत त्यापैकी एका प्रकरणी फौजदारी गुन्हा नोंदविणे कामी मा. मुख्य अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर यांनी पंचायत समिती पारनेर येथील कार्यरत विस्तार अधिकारी पंचायत समिती रवींद्र माळी यांना आदेशित केले होते. सदर प्रकरणी गुन्हा दाखल करू नये म्हणून आझाद ठुुुबे व अलंकार काकडे यांनी दोन वेळा जाहीरपणे मारण्याची धमकी दिली आहे. दिनांक 21 फेब्रुवारी 2019 रोजी त्यांनी आयोजित केलेल्या मोर्चाच्याप्रसंगी तहसील कार्यालयासमोर उपस्थित जनसमुदाय अधिकारी-कर्मचारी यांचे समक्ष दांंडक्याने मारण्याची धमकी दिली होती. त्याचबरोबर विविध वर्तमानपत्रातून बातम्या देखील प्रसिद्ध झाले आहेत तसेच शुक्रवार २ आॅगस्ट सायंकाळी सहा नंतर आझाद ठुबे व जिल्हा परिषद सदस्य उज्वला ठुबे व १५ -२० कार्यकत्यांनी अनार्धिकृतपणे प्रवेश करून त्यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांच्या समक्ष मला ठोकून काढण्याची धमकी दिली आहे.
यावरून आझाद ठुबे व अलंकार काकडे व त्यांचे सहकारी यांच्याकडून माझे व माझ्या कुटुंबाच्या जीविताचा धोका निर्माण झाला आहे. तसेच मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या आदेशाप्रमाणे फौजदारी गुन्हा नोंदवू नये यासाठी माझ्यावर खोटे आरोप करून मला खोट्या आरोपात गोठवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
आझाद ठुबे यांच्या पत्नी उज्वला ठुबे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कडे अनेकदा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत माझी वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे वारंवार माझ्या विरुद्ध खोट्या तक्रारी करत आहे. तरी भविष्यात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी संबंधित गुन्हा दाखल करावा असे लेखी पञात तनपुरे यांनी नमुद केले आहे.
Post a Comment