माय नगर वेब टीम
अहमदनगर - राज्यात अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाला असून नद्यांना पूर आला आहे. आज सायंकाळी 6.00 वाजता नांदुर मधमेश्वर बंधा-यातुन गोदावरी नदीपात्रात 2,62,150 क्युसेस विसर्ग सोडण्यात आलेला आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मेाठया प्रमाणावर वाढ होवून नदीला पूर आला आहे. दरम्यान नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पूरस्थिती मुळे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी कोपरगाव तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात राज्यात ठीक ठिकाणी अतिवृष्टी होत आहे. तसेच आगामी दोन दिवस पुन्हा अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
जिल्हयातून वाहणा-या गोदावरी नदीत नाशिक जिल्हयातील नांदूरमधमेश्वर बंधा-यातून 2,69,354 क्युसेस विसर्ग सोडण्यात आलेला आहे. कुकडी नदीस येडगांव धरणातून 13,000 क्युरसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. भिमा नदीस दौड पुल येथे 1,19,448 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाउूस झाल्यास धरणाच्या पाणीसाठयात वाढ होऊन नदीपात्रातील विसर्गात देखील वाढ होण्याची शक्यता आहे. आगामी काळात अहमदनगर तसेच नाशिक व पुणे जिल्ह्यातील धरणातून सोडलेल्या निसर्गात वाढ झाल्यास जिल्हयातून वाहणा-या प्रवरा, गोदावरी, भिमा, घोड, कुकडी नदीच्या पाण्यात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नद्या काठच्या गावांना सतर्कता इशारा दिला आहे.
1500 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले
नदीला पूर आल्याने श्रीरामपुर, नेवासा, राहता, कोपरगाव तालुक्यातील नदीकाठच्या गावांमधील सुमारे दीड हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
जिल्ह्यात रीप रीप
गेल्या आठ दिवसापासून जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस होत आहे. तसेच आज सकाळपासून पावसाने नगर तालुका, नगर शहर, पारनेर, श्रीगोंदा यासह इतर तालुक्यात पावसाने हजेरी लावली.
कोपरगाव मधील शाळांना सुट्टी जाहीर
नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने गोदावरी नदीच्या पूर आला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी कोपरगाव तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
Post a Comment