बळीराजासाठी खुशखबर! दोन महिन्यात 100 टक्के पाऊस



हवामान विभागाचा अंदाज

माय नगर वेब टीम

मुंबई : ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान राज्यात 100 टक्के पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने (IMD - इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट) व्यक्त केला आहे. आयएमडीने जून महिन्यात जाहीर केलेल्या माहितीमध्ये मान्सून हंगामात सर्वसाधारण म्हणजेच 96 टक्के, तर ऑगस्ट महिन्यात 99 टक्के पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला होता. आयएमडीने गुरुवारी (1 ऑगस्ट) दुसऱ्या टप्प्यातील मान्सूनबाबतचा अंदाज जाहीर केला आहे. या अंदाजातही जून महिन्यातील सर्वसाधारण पावसाचा अंदाज कायम ठेवण्यात आला आहे. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात आत्तापर्यंत सरासरी ५५ टक्के पाऊस झाला आहे. भंडारदरा धारण ८५ टक्के तर मुळा धरण ५५ टक्के भरले आहे.


आयएमडीकडून प्रिन्सिपल कम्पोनंट रिग्रेशन (पीसीआर) आणि मान्सून मिशन कपल्ड फोरकास्टिंग सिस्टीमनुसार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सर्वसाधारणपणे पावसाच्या हंगामातील (जून ते सप्टेंबर) पावसापैकी 49 टक्के पाऊस ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पडतो.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post