मोदी सरकारला धक्का ; अर्थव्यवस्थेची सातव्या क्रमांकावर घसरण


माय नगर वेब टीम
नवी दिल्ली : जगात सर्वात शक्‍तीशाली असणाऱ्या अर्थव्यवस्थेच्या यादीत भारताची घसरण झाली आहे. पहिल्या पाचमध्ये असणाऱ्या भारताची चक्‍क सातव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. याविषयीची आकडेवारी जागतिक बॅंकेने जाहीर केली आहे.


भारताला पाचव्या स्थानावरून मागे टाकत युनायटेड किंगडम आणि फ्रान्सने जागतिक अर्थव्यस्थांच्या यादीमध्ये अनुक्रमे पाचवे आणि सहावे स्थान मिळवले आहे. त्यामुळे आता भारत या यादीमध्ये सातव्या क्रमांकाला फेकला गेला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प सादर करताना पाच ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचं उद्दिष्ट पुढच्या काही वर्षांमध्ये नक्की गाठू असा विश्वास व्यक्त केला होता. त्यामुळेच ही आकडेवारी मोदी सरकार आणि सरकारच्या आर्थिक धोरणांसाठी धक्का असल्याचे म्हटले जात आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post