महापालिका कर्मचारी पतसंस्थेच्या कर्ज मर्यादेत वाढ
माय नगर वेब टीम
अहमदनगर -
महापालिका कर्मचारी पतसंस्थेच्यावतीने सभासदांसाठी देण्यात येणा-या तातडीच्या कर्जाच्या मर्यादेत वाढ करण्यात आली असून पुर्वी सभासदांना दिले जाणारे १० हजार रुपयांचे तातडी कर्ज आता १५ हजार रुपये करण्यात आले आहे.
महापालिका कर्मचारी पतसंस्थेच्या २ जून रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत तातडी कर्जाच्या मर्यादेत पाच हजारांची वाढ करण्याचा तसेच मयत सभासदांचे पुर्वी माफ करण्यात येणारे ५० हजाराचे कर्ज वाढवून त्याची मर्यादा १ लाख करण्याचा ठराव करण्यात आला होता. हे दोन्ही ठराव मंजुरीसाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे पाठविण्यात आले होते. या ठरावांना जिल्हा उपनिबंधकांनी मंजुरी दिली असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन विकास गिते यांनी दिली.
नव्याने मंजुर झालेल्या ठरावानुसार वाढीव १५ हजार रुपये तातडी कर्जाचे वितरण पतसंस्थेच्यावतीने सुरू करण्यात आले असून त्याचा शुभारंभ चेअरमन विकास गिते, संचालक बाबासाहेब मुदगल, किशोर कानडे, बाळासाहेब गंगेकर, व्यवस्थापक प्रविण जोशी, आनंद तिवारी, महादेव कोतकर, महेश पवार व सभासदांच्या उपस्थितीत करण्यात आला. | महापालिका कर्मचारी पतसंस्था ही सभासदांची कामधेनू आहे. सभासदांना अडचणीच्या काळात मदत करण्यास सदैव तत्पर असते. सभसदांच्या मुला-मुलींच्या लग्नासाठी, शिक्षणासाठी तसेच आरोग्य उपचारासाठी पतसंस्थेने नेहमीच आर्थिक मदत केलेली आहे. पतसंस्थेचे सभासद हिताचे काम सर्व संचालक मंडळ यापुढेही अशाच पद्धतीने चालू ठेवणार असल्याचे चेअरमन विकास गिते यांनी सांगितले.
Post a Comment