बाजार समितीतील कर्मचारी बेमुदत संपावर ; कामकाज ठप्प




शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी; कार्यालयीन कामकाज ठप्प

माय नगर वेब टीम

अहमदनगर -

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सचिव ते शिपाई पदापर्यंत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत समाविष्ट करुन घ्यावे या मागणीसाठी मुंबई येथील आझाद मैदानात महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न बाजार समिती कृति समितीच्या वतीने २७ जुलैपासून आंदोलन सुरू असून या आंदोलनास सक्रिय पाठिंबा देण्यासाठी नगर बाजार समितितील सर्व कर्मचारी गुरुवारी (दि.१) सकाळपासून बेमुदत सामुहिक रजेवर गेले आहेत.

कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामुळे बाजार समितीचे कार्यालयीन कामकाज पुर्णत: ठप्प झाले आहे. या कर्मचाऱ्यांच्यावतीने सचिव अभय भिसे, सहाय्यक सचिव बाळासाहेब लबडे, संदीप पवार, लेखापाल विशाल साळवे, निरीक्षक संजय काळे, हिराबाबा पुरी, जयवंत राऊत, संजय नन्नवरे, सचिन सातपुते, जयसिंग भोर यांच्यासह शिष्टमंडळाने याबाबत बुधवारी (दि.३१) जिल्हा उपनिबंधक तसेच बाजार समितीचे सभापती विलासराव शिंदे यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. त्यानुसार गुरुवारी सकाळपासून आंदोलन सुरु करण्यात आले. या कर्मचाऱ्यांनी बाजार समिती कार्यालयासमोर आपल्या मागण्यांसाठी निदर्शने करत धरणे आंदोलन केले.

आंदोलनास विविध संघटनांचा पाठिंबा
बाजार समिती कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास विविध संघटनांनी पाठिंबा दिला. जिल्हा हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले यांनी जिल्हा उपनिबंधकांना पत्र देऊन या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा असल्याचे जाहिर केले. जिल्हा इमारत व इतर बांधकाम कामगार संघटनांच्यावतीने अध्यक्ष बाबा आरगडे यांनीही जिल्हा उपनिबंधकांना पत्र देऊन या आंदोलनास सक्रिय पाठिंबा जाहिर केला. यावेळी उपाध्यक्ष गोविंद सांगळे, सतिष शेळके, नंदू डहाणे, अशोक बाबर हेही उपस्थित होते. याशिवाय भुसार व भाजीपाला विभागातील सर्व महिला कामगार तसेच बैलगाडीवान संघटना, ऑटोरिक्षा पंचायत संघटना, मालवाहतुक रिक्षाटेम्पो संघटना, सुरक्षा रक्षक संघटना यांनीही बाजार समिती कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनास पाठिंबा दिला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post