धक्कादायक...! विजेचा शॉक बसून 11 जनावरे दगावली
माय नगर वेब टीम
अहमदनगर -
मुकुंदनगर येथे नदीम भाई मशीवाले यांच्या गोठ्यात काल रात्री विजेचा शॉक लागून 11 जनावरे दगावल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेत सुमारे 8 ते 10लाखाचे नुकसान झाले आहे.
अहमदनगर मुकुंदनगर येथे सीबीआय कॉलनीत नदीम भाई मशीवाले यांच्या गोठ्यात काल रात्रीच्या सुमारे दोन वाजता विजेचा शॉक लागून 11 जनावरे दगावली. त्यामध्ये दोन घोडे, पाच शेळ्या, एक गाई, दोन म्हशी चे पिल्ले असा एकूण 11 जनावरे विजेचा शॉक लागून दगावले. यासंदर्भात कॅम्प पोलीस स्टेशन येथे विशेष तक्रार दाखल करण्यात आली आहे. घटनास्थळी पोलीस कर्मचारी पंचनामा केला आहे.


Post a Comment