
माय नगर वेब टीम
पुणे - खेकड्यांनी पोखरल्यामुळे तिवरे धरण फुटल्याचा दावा केल्यानंतर जलसंधारण मंत्री तानाजी सावंत टीकेचा विषय ठरले आहेत. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सावंतांच्या घराबाहेर खेकडे सोडून अनोखे आंदोलन केले.
'तानाजी सावंत यांच्या घरी खेकड्यांनी धुमाकूळ घातला आणि त्यांचं निवासस्थान फोडण्याचा प्रयत्न केला, त्याचवेळी आमच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ही माहिती मिळाली. आम्ही सर्वांनी जलसंधारण मंत्र्यांच्या घरी धाव घेतली. या खेकड्यांना पकडून भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनला पोलिस निरीक्षकांच्या ताब्यात दिले ' असा दावा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला.
तिवरे धरण फोडल्यानंतर हे खेकडे मंत्र्यांचे घरही फोडू लागले आहेत. त्यामुळे तातडीने या खेकड्यांवर 302 अंतर्गत गुन्हा दाखल करावा. अन्यथा उद्या अजून काही दुर्घटना घडू शकतील, अशी उपरोधिक तक्रार राष्ट्रवादीतर्फे करण्यात आली.
Post a Comment