' राष्ट्रवादीच्या ' त्या ' पदाधिकाऱ्याच्या खांद्यावर भगवा
माय नगर वेब टीम
मुंबई - राष्ट्रावादीचे नेते आणि माजी मंत्री सचिन आहिर यांनी आज मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. राष्ट्रवादी पक्ष सोडताना फार आनंद होत नाही, मात्र काही वेळा कठोर निर्णय घ्यावे लागतात, अशी प्रतिक्रिया सचिन अहिर यांनी दिली आहे.
बाळासाहेब ठाकरे याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवसेनेत आलो आहे. राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न करणार नाही, शिवसेना पक्ष वाढवण्याचा काम करणार आहे, असं सचिन अहिर म्हणाले.
राष्ट्रवादी सोडताना फार आनंद होतोय असं नाही. गेली अनेक वर्ष एका विचाराने आणि एका प्रवाहात काम करत आलो आहे. शरद पवार यांच्यासोबत कधी न सुटणारी साथ आहे. राजकारणात काही वेळा काही निर्णय घ्यावे लागतात. मात्र ते निर्णय योग्य की अयोग्य हे काळच ठरवेल, अशी प्रतिक्रिया सचिन अहिर यांनी दिली.
Post a Comment