बसस्थानकात बस चालकाला बेदम मारहाण



माय नगर वेब टीम
अहमदनगर - पारनेर ते नाशिक या मार्गाने जात असलेल्या एसटी महामंडळाच्या बस मधील चालकास कायनेटिक चौक येथे तसेच माळीवाडा बस स्थानक मध्ये येऊन अज्ञात व्यक्तीने मारहाण केली. पारनेर वरून बस नाशिक कडे निघाली होती. अहमदनगर येथे कायनेटिक चौकामध्ये आले असता एम एच 16 बीए 6888 मोटरसायकल चालकाने बस चालकास हूल देऊन गाडी आडवी लावून कायनेटिक चौक येथे मारहाण केली. सदर घटना घडली असता यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यासाठी बस घेऊन माळीवाडा बस स्थानक येथे आले असता पुन्हा अज्ञात व्यक्तींनी त्यावर हल्ला चढवला. या मारहाणीत चालक एकनाथ पवार जखमी झाला. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुुन्ह दाखल करण्याची
प्रक्रिया सुरू आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post