गांधी मैदान परिसरात सुरू असणाऱ्या सेक्स रॅकेटवर 'कोतवाली'चा छापा
माय नगर वेब टीम
अहमदनगर - नगरमध्ये गांधी मैदान परिसरात सेक्स रॅकेटवर छापा टाकून पोलिसांनी चार महिलांसह रॅकेट चालविणाऱ्या महिलेला बेड्या ठोकल्या आहेत. कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
गांधी मैदान परिसरात काही महिला वेश्या व्यवसाय करत असल्याची गोपनीय माहिती खबऱ्याकडून शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना मिळाली. या माहितीच्या आधारे साक्षीदार व पंचा समवेत कोतवाली पोलिसांनी सायंकाळी 7 च्या सुमारास गांधी मैदानात कारवाई केली. छापा टाकत 5 महिलांना ताब्यात घेतले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी नगरमध्ये तपोवन रोडवर सेक्स रॅकेटवर छापा टाकला होता. तसेच नगर-औरंगाबाद रोडवरून एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर छापा टाकून महिला व पुरुषांना अटक केली होती.
बऱ्याच दिवसांपासून गांधी मैदान परिसरात काही महिला वेश्या व्यवसाय करत होत्या. त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत होती.
अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई चा धडाका लावला असल्यामुळे अवैध धंदे करणारे धास्तावले आहेत.
Post a Comment