नगरमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
माय नगर वेब टीम
अहमदनगर - नगर शहरातील तपोवन रोड परिसरात वेश्या व्यवसाय करणार्या घरावरती छापा टाकला. या छाप्यात चार पुरुष व दोनमहिलांना ताब्यात घेण्यात आले. या छाप्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
तपोवन रोड भागात वेश्या व्यवसाय चालू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावरून पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, महिला पोलीस उपनिरीक्षक रामेश्वरी पांढरे व कर्मचारी यांच्या पथकाने तपोवन रोड भागातील श्रावणी कॉलनी येथे एका घरावर छापा टाकला. तेथे काही महिला व पुरुष आढळल्या. पोलिसांनी चार पुरुष व एका महिला एजंट सह एका महिलेला ताब्यात घेतले आहे.
कैलास महादेव क्षिरसागर, संतोष अर्जुन भुजबळ, समीर मन्नान शेख, अक्षय दरंदले असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
आज सायंकाळच्या सुमारास तोफखाना पोलिसांनी ही कारवाई. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांनी पदभार घेतल्यापासून अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले आहेत.

Post a Comment