इमामपूर घाटात चालती बस पेटली ; 60 प्रवासी बालबाल बचावले


माय नगर वेब टीम
अहमदनगर - मंगळवार (7 जुलै रोजी) एसटी बस व ट्रकचा अपघात होऊन एसटी पेटल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी (11 जुलै) दुपारी इमामपूर घाटात चालती बस पेटल्याची घटना घडली. हा प्रकार ड्रायव्हरच्या लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. बस मध्ये 50 ते 60 प्रवासी होते.

सविस्तर हकीकत अशी की, आज दुपारी अडीचच्या सुमारास एसटी चालक गौतम वर्गट, वाहक- डोमटकर मेहकरवरुन पुण्याकडे (एसटी क्रमांक एम.एच ४० ए क्यु ६२८६) जात असताना इमामपुर घाटात एसटीच्या समोरील बाजूने धूर येत असून गाडीने अचानक पेट घेतल्याचे ड्रायव्हर च्या लक्षात आले. ड्रायव्हरने विलंब न करता गाडी थांबविली. दरम्यान पाठीमागुन येणा-या पंढरपुरला जाणाऱ्या वारक-यांचा पाण्याचा टँकर येत होता. एसटीला आग लागल्याचे लक्षात आल्याने त्यांनीही टँकर च्या पाण्याने आग विझवली. एसटी ड्रायव्हर च्या सतर्कतेने सुदैवाने कोणतीही जीवीत हानी नाही. एसटी मध्ये सुमारे ५० ते ६० प्रवासी होते. प्रवाशांना खाली उतरवून त्यांची पर्यायी व्यवस्था करण्यात आली.


मंगळवारी औरंगाबाद रोडवरील शासकीय विश्रामगृह समोर एसटी बस व ट्रक चा अपघात झाला. या अपघातानंतर एसटी बसने पेट घेतला. बस जळून खाक झाली. त्यानंतर गुरुवारी दुपारी पुन्हा इमामपूर घाटात चालत्या बसने पेट घेतला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post