नगरमधील उड्डाणपुलाचा महिन्यात श्रीगणेशा - खा.डाॅ.विखे यांनी घेतली दिल्लीत ना. गडकरींची भेट


उड्डाणपुलाचे काम महीन्यात सुरू करण्याचे ना.गडकरीचे अधिकाऱ्यांना आदेश!

माय नगर वेब टीम
अहमदनगर
नगर शहरातील बहुप्रतिक्षित प्रस्तावित उड्डाणपूलाचे काम सुरू होण्याच्या दृष्टीने खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी लक्ष घातले आहे. शहरातील उड्डाण पुलाच्या कामाची सुरूवात महीन्याभरात करण्याचे आदेश केंद्रीय भूपृष्ठवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या असल्याची माहीती खा.सुजय विखे पाटील यांनी दिली.

शहरातील उड्डाणपुलाच्या संदर्भात खा.डाॅ.विखे पाटील यांनी केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी यांची भेट घेवून या उड्डाणपुलाचे काम तातडीने सुरू होण्यासंदर्भात मागणी केली.याबाबतचे सविस्तर निवेदनही त्यांनी मंत्र्याना दिले.

याबाबत ना.गडकरी यांनी उड्डाणपुलाच्या कामाची वस्तूस्थिती जाणून घेतली. या कामाला प्रशासकीय मंजूरी मिळून निविदा प्रक्रीया पूर्ण झाली असताना केवळ भूसंपादनाच्या कारणामुळे हे काम सुरू होवू शकत नसल्याची बाब खा.डाॅ.विखे पाटील यांनी ना.गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिली.




उड्डाणपुलाच्या कामासाठी काही ठिकाणी बाकी असलेल्या भूसंपादनाचा कोणताही अडथळा कामात येवू न देता या कामाला सुरूवात करून, राहीलेले भूसंपादन सहा महीन्यात पूर्ण करण्याचे निर्देशही ना.गडकरी यांनी अधिकार्यांना दिले असल्याचे डाॅ.विखे पाटील यांनी सांगितले.




नगर शहरातील उड्डाण पुलाचा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित होता.लोकसभा निवडणुकीच्या निमिताने या कामाला प्राधान्य देवून मार्गी लावण्याचा शब्द आपण दिला होता त्याची प्रत्यक्ष सुरूवात आता झाली असून केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी यांनी याबाबत घेतलेले सकारात्मक निर्णय नगरकरांना दिलासा देणारे असल्याचे खा.डाॅ. विखे यांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post