कार-ट्रक भीषण अपघातात 3 ठार



माय नगर वेब टीम

पुणे-

पुणे-बंगळुरू महामार्गावर कार आणि ट्रक यांच्यात आज(दि.7)पहाटे भीषण अपघात झाला. पुणे-बंगळुरू महामार्गावर देहुरोडजवळ हा अपघात झाल्याची माहिती वृत्तसंस्था एएनआयने दिली आहे. या वृत्तानुसार अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एकजण जखमी झाल्याची माहिती आहे.

हा अपघात इतका भीषण होता की ट्रकसोबत झालेल्या टक्कर नंतर अपघातग्रस्त कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. दरम्यान अपघातातील मृतांची ओळख अद्याप पटलेली नसून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post