शहरात फिरणाऱ्या तडीपाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
माय नगर वेब टीम
अहमदनगर
हद्दपार कालावधीमध्ये अहमदनगर शहरात वास्तव्य करणारा टिंग्या उर्फ सुमेद साळवे, रा. गौतमनगर, बालिकाश्रम रोड, अहमदनगर यांस स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत.
हकीगत अशी की २० जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना गोपनिय माहीती मिळाली कि, टिंग्या उर्फ सुमेद साळवे, यास अहमदनगर शहरातून हद्दपार केलेले असतानाही तो बालिकाश्रम भागामध्ये फिरत आहे. अशी माहीती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ मन्सूर सय्यद, रविन्द्र कर्डीले, किरण जाधव, संदीप पवार, विनोद मासाळकर, योगेश सातपूते अशांनी मिळून हद्दपार इसमाचा शोध बालिकाश्रम परिसरात शोध घेतला असता हद्दपार टिंग्या उर्फ सुमेद किशोर साळवे, हा न्यु आर्टस्, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेजचे पाठीमागील बाजूस मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले.
त्यास दोन वर्षाचे कालावधी करीता अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सिमेच्या हद्दीमधून हद्दपार करण्यात आलेले असतानाही सदर हद्दपार आदेशाचे भंग करुन अनाधिकाराने अहमदनगर शहरात प्रवेश करुन वास्तव्य करीत असताना मिळून आल्याने त्याचे विरुध्द पोकॉ योगेश अशोक सातपूते यांचे फिर्यादीवरुन तोफखाना पो.स्टे. येथे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील कार्यवाही तोफखाना पो.स्टे. हे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक ईशू सिंधु , अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी केलेली आहे.
Post a Comment