धक्कादायक ! - पैशाच्या वादातून नगरमध्ये एकाचा कोयत्याने खून



माय नगर वेब टीम

अहमदनगर : पैसे देण्याघेण्याच्या वादातून एकाचा कोयत्याने वार करून खून केल्याची घटना अहमदनगर मनमाड रस्त्यावरील पद्मावती पेट्रोल पंपाजवळ घडली. यात मारामारीत योगेश बाळासाहेब इथापे वय ३० रा.विशाल मार्बल, पद्मावती चौक, मनमाड रोड, याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी कृष्णा रघूनाथ गायकवाड वय ३६ रा.पद्मावती चौक,सावेडी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


याबाबत सविस्तर असे की, योगेश इथापे व कृष्णा गायकवाड या दोघात आर्थिक कारणावरून या दोघा तरूणांत गुरूवारी रात्री वाद झाले. या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले व यातून कृष्णा गायकवाड याने योगेश इथापे याच्यवर थेट

कोयत्याने सपासप वार केले. या जीवघेण्या हल्ल्यात योगेश गंभीर जखमी झाल्यामुळे त्याला एका खासगी रूग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी कृष्णा गायकवाड हा स्वता:हून तोफखाना पोलिस ठाण्यात हजर झाला. नगर मनमाड रोडवरील पद्मावतीपे ट्रोल पंपाजवळ योगेश इथापे याचे चहाचे दुकान आहे. तर कृष्णा गायकवाडया चे सायकल दुरूस्तीचे दुकान आहे. या घटनेमुळे सावेडी परिसरात खळबळ उडाळी

आहे. या बाबत तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post