मंदिर निर्माणसाठी शुक्रवारी बाबा रामदेवजी महाराज यांचा 'जम्मा जागरण' कार्यक्रम
माय नगर वेब टीम
अहमदनगर- राजस्थान येथील रूणिचा धाम येथील श्री बाबा रामदेव महाराज(रामपीर) यांच्या भव्य मंदिर निर्माण कार्यासाठी श्री रामदेव भक्त मंडळ ट्रस्टच्या वतीने शुक्रवार दिनांक 7 जून 2019 रोजी नंदनवन लॉन न्यू टिळक रोड येथे दुपारी 3 वाजता विशाल 'जम्मा जागरण' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र मालू यांनी दिली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाबा रामदेव यांचे वंशज श्री रामदेवरा सेवा समितीचे अध्यक्ष आनंदसिंहजी तंवर, श्री राणीदास सिंहाची तंवर, सचिव खेतमलजी शर्मा व पुणे येथील परमभक्त अशोकजी मुथा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या जम्मा जागरणा मध्ये श्री बाबा रामदेव यांचा जन्मवृत्तान्त, विवाह सोहळ्या, अखंड ज्योत ,होमहवन, महाआरती व नागपूर येथील सुप्रसिद्ध भजन गायक पंडित राजेंद्र शर्मा यांचे भजन होणार आहे. संध्याकाळी आठ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संतोष कटारिया यांनी दिली. तसेच पुढील माहिती देताना सुरेश धामट म्हणाले अहमदनगर, पुणे ,औरंगाबाद व परिसरातील असंख्य भक्तांचे श्रद्धास्थान असलेले श्री बाबा रामदेवजी महाराज यांचे अहमदनगर येथे एक मंदिर असावे. सर्वांना दर्शनाचा लाभ घेता यावा म्हणून चिपाडे मळा सारसनगर येथे भव्य मंदिर निर्माण कार्य हाती घेतले असून यामध्ये सालासर बालाजी मंदिर व श्री सच्चीयाय माता मंदिरासह भव्य सभामंडप व विविध सुविधा असणाऱ्या मंदिराची निर्मिती करण्यात येणार आहे. यासाठी अनेक दानशूर मान्यवरांनी सहकार्य केले. तरी सर्व विशाल जम्मा जागरणाला उपस्थित राहून मंदिर निर्माण कार्यात सहकार्य करावे असे आव्हान श्री रामदेव भक्त मंडळाच्या सर्व सदस्यांनी केले आहे.

Post a Comment