शालिमार एक्स्प्रेसमध्ये स्फोटके आढळल्याने खळबळ ; कडेकोट सुरक्षा


माय नगर वेब टीम

मुंबई : शालिमार एक्स्प्रेसमध्ये जिलेटिनच्या 5 कांड्या सापडल्यानं एकच खळबळ उडाली आहे. गाडीची सफाई करत असताना या कांड्या आढळल्या आहेत. रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे पोलीस, बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत.
माहिती अशी की, हावडा-लोकमान्य टिळक टर्मिनस शालिमार एक्स्प्रेसमध्ये जिलेटिनच्या पाच कांड्या सापडल्या आहेत. शालिमार एक्स्प्रेस टर्मिनसवर आली असता सफाई करताना या कांड्या आढळल्या. टर्मिनसचा परिसर रिकामा करण्यात आला आहे.घटनास्थळी आरपीएफ, जीआरपी तसेच मुंबई पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी पोहोचले आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post