‘नीट’ परीक्षेचा निकाल जाहीर


माय नगर वेब टीम
नवी दिल्ली – नॅशनल इलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट अर्थात “नीट’ परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे देशभरामध्ये घेण्यात आलेल्या या प्रवेश परीक्षेमध्ये राजस्थानच्या नलीन खंडेवालने प्रथम क्रमांक पटकावला असून दिल्लीच्या भाविक बन्सलने द्वितीय तर उत्तर प्रदेशच्या अक्षत कौशिकने तृतीय क्रमांक पटकवला आहे.

मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया व डेंटल कौन्सिल ऑफ इंडिया या संस्थांची मान्यता प्राप्त असलेल्या महाविद्यालयांमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश मिळविण्यासाठी ‘नीट’ ही प्रवेश परीक्षा देणे अनिवार्य असून यावर्षी १४,१०,७५५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. गेल्या महिन्यामध्ये ५ मे आणि २० मे रोजी ही परीक्षा देशभरामध्ये आयोजित करण्यात आली होती.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post