काश्मीरमध्ये सुरक्षादलांवर दगडफेक


माय नगर वेब टीम
जम्मू-काश्मीर: संपूर्ण देश ईदचा सण साजरा करत असताना काश्मीरमध्ये मात्र सुरक्षादलांवर दगडफेक करण्यात येत असून आंतरराष्ट्रीय दहशतवादी आणि जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या असलेल्या मसूद अजहरच्या नावाचे पोस्टर लावले जात आहेत.


श्रीनगर येथे ईदचे नमाज पठण झाल्यानंतर भारतविरोधी नारे देण्यास सुरुवात झाली. काश्मीरचे पाकिस्तान होईल अशा आशयाचे नारे देण्यात आले. या प्रकारावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुरक्षा दलांवर दगडफेकही करण्यात आली. दगडफेक करणाऱ्यांनी चेहरा मास्कने झाकला होता. दहशतवादी असलेल्या मुसाच्या नावाने नारे देत सुरक्षादलाचा प्रदर्शनकर्त्यांनी कडवा विरोध केला. तसंच काश्मीरमध्ये पाकिस्तान होणारच असे नारेही त्यांनी दिले. या दगडफेकीत सुरक्षा दलाचे काही जवान किरकोळ जखमीही झाले आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post