८ जूनपासून गायीचे दूध २ रुपयांनी महागणार




माय नगर वेब टीम

पुणे: अमूलच्या दुधाच्या दरात झालेल्या वाढीनंतर आता अन्य दूध उत्पादकांनीही दरवाढीचा निर्णय घेतला आहे. पुण्यात खासगी सहकारी दूध उत्पादकांच्या बैठकीत दूधदरवाढीचा निर्णय घेण्यात आला.
यानुसार गायीच्या दुधाचे दर २ रुपये प्रति लिटर दराने वाढणार आहेत. नवे दर ८ जूनपासून लागू होणार आहेत. अमूल, मदर डेरी कंपनीच्या दुधाचे दरही अलीकडेच दोन रुपये प्रति लिटर दरांनी वाढले आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post