माय नगर वेब टीम
अहमदनगर - शिर्डी व अहमदनगर लोकसभा मतदार संघातील उमेदवारानी प्रशासना समोर अंतिम खर्च सादर केला आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार खा.डॉ.सुजय विखे यांनी सुमारे ६४लाख रुपयाचा खर्च त्यांनी खासदारकीसाठी केला आहे. त्याच्या विरोधात असलेले आमदार संग्राम जगताप यांनी 61लाख रूपयाचा खर्च सादर केला आहे. तर शिर्डीचे शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे व कॉग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे याचा खर्च प्रत्येकी 59 लाख खर्च सादर केला आहे.
अहमदनगर लोकसभा निवडणुकीसाठी नगर मतदारसंघातून 19 तर शिर्डी मतदार संघातून 20 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात होते. या निवडणुकीतील खर्च उमेदवारांनी अंतिम स्वरूपात प्रशासनासमोर सादर केला. दोन्ही मतदार संघातील उमेदवारांनी पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील खर्च प्रशासनासमोर सादर केला होता. मात्र निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर एक महिन्याच्या आत अंतिम खर्च सादर केला नव्हता. दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांना 23 जून पर्यंत खर्च सादर करण्याची मुदत देण्यात आली होती.
अहमदनगर मतदार संघात भाजपचे सुजय विखे यांचा खर्च सर्वधिक 64 लाख 49 हजार 332 झाला आहे. त्याचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी 61 लाख 8 हजार 138 रुपयेचा खर्च नोंदवला आहे.
अहमदनगर मतदारसंघातील उमेदवारांचा खर्च
खा.डॉ. सुजय विखे : ६४ लाख ४९ हजार ३३२ रुपये
आ. संग्राम जगताप : ६१ लाख ८ हजार १३८ रुपये
नामदेव वाकळे : १ लाख ५५ हजार ६८९ रुपये
कलीराम पोपळघट : २५ हजार ८०० रुपये
धीरज बताडे : १४ हजार ६३० रुपये
सुधाकर आव्हाड : ३ लाख ५३ हजार ४२१ रुपये
संजय सावंत : ४४ हजार ४५० रुपये
आप्पासाहेब पालवे : २५ हजार ८०० रुपये
कमल सावंत : ४ लाख ४१ हजार ४४९ रुपये
भास्कर पाटोळे : १ लाख २ हजार ५३२ रुपये
रामनाथ गोल्हार : २७ हजार ५२० रुपये
शेख अबीद हुसेन : १ लाख ४० हजार ६८ रुपये
साईनाथ घोरपडे : ३५ हजार ४८९ रुपये
संजीव भोर : ६ लाख ९० हजार ५६४ रुपये
संदीप सकट : ३४ हजार ४२६ रुपये
श्रीधर दरेकर :५० हजार ११५ रुपये
फारूख शेख : २८ हजार ३०० रुपये
दत्तात्रेय वाघमोडे : २७ हजार रुपये
ज्ञानदेव सुपेकर : १ लाख १५ हजार ४४५ रुपये
'शिर्डी'तील उमेदवारांचा निवडणूक खर्च
भाऊसाहेब कांबळे : ५९ लाख ७९ हजार १३२
सदाशिव लोखंडे : ५९ लाख ७३ हजार १८३
बन्सी सातपुते : ७ लाख ४२ हजार १०२
सुरेश जगधने : ४ लाख ३९ हजार ४३१
संजय सुखदान : १४ लाख ४६ हजार १८६
अशोक जाधव : १ लाख ७७ हजार ९०७
प्रकाश आहेर : २ लाख ९३ हजार ५३३
विजय घाटे : १ लाख ७७ हजार ८५६
भाऊसाहेब राजाराम वाकचौरे : २८ लाख १२ हजार ५४४
गोविंद अमोलिक : १४ हजार ४७०
अशोक वाकचौरे : १ लाख २८ हजार ५०
किशोर रोकडे : १७ हजार ७९
गणपत मोरे : ३८ हजार ७८७
प्रदीप सरोदे : ८ लाख ५२ हजार ६९७
बापू रणधीर : १४ हजार २६५
शंकर बोरगे : २९ हजार २६२
भाऊसाहेब जयराम वाकचौरे : १७ हजार २७२
सचिन गवांदे : ४५ हजार ३६९
सुभाष त्रिभुवन : ७९ हजार ६२८
संपत समिंदर : ३० हजार 701

Post a Comment