काँग्रेस अध्यक्षपदासाठी महाराष्ट्रातून या नेत्याचं नाव चर्चेत ??
माय नगर वेब टीम
नवी दिल्ली  - लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आपल्या राजीनाम्यावर ठाम आहेत. गांधी घराण्याशिवाय अध्यक्ष सुचवा, गांधी घराण्यातला नको, असे खुद्द राहुल यांनी सांगितले. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातून काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव शर्यतीत आहे, अशी बातमी ‘रिपब्लिक टीव्ही’ने दिली आहे.


लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मानहानीकारक पराभव स्विकारावा लागला. त्यानंतर काँग्रेसमध्ये राजीनामा नाट्य सुरू झाले आहे.


काँग्रेस अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. अँटेनी, राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्याही नावाचा समावेश आहे.

दरम्यान, काँग्रेस वर्किंग कमिटीने पक्षांतर्गत बदलासाठी राहुल गांधींना पूर्ण अधिकार दिले आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post