बौद्ध संस्कार संघाच्यावतीने मान्यवरांचा सत्कार
नगर -
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून अहमदनगरमधील दि बुद्धिस्ट बहुउद्देशिय असोसिएशन व बौद्ध संस्कार संघ या संस्थेच्यावतीने आम्रपाली गार्डन येथे आयोजित करण्यात आलेल्या भीम पहाट कार्यक्रमात नगरमधील विविध क्षेत्रात यशस्वी झालेल्या व सातत्यापूर्ण कामगिरी करणार्या बौद्ध समाजातील व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. यामध्ये पीएच,डी. मिळाल्याबद्दल डॉ.सुरेखा गांगुर्डे, डॉ.प्रमोद साखरे, डॉ.अमन बगाडे,डॉ.सुजाता सोनवणे, डॉ.बापू चंदनशिवे यांचा तसेच पदोन्नत्ती झाल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी अजय महादेव साळवे, ज्येष्ठ लिपिक गिरीश गायकवाड, अभियंता संजीव घोडके, तांत्रिक अधिकारी नभा गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी शाहीर दादू साळवे व सहकार्यांनी सादर केलेल्या गीतांना उपस्थितांनी दाद दिली. आयोजक भाऊसाहेब देठे, अनिल अंबावडे, भाऊसाहेब सोनवणे, प्रा.डॉ.प्रविण सूर्यवंशी, किशोर वाघमारे, एन.के.इंगोले, भाऊसाहेब ब्रम्हाने,डॉ.योगेश सोनवणे, प्रा.विश्वासराव कांबळे, एल.डी.मधाळे आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक इंजि.मंदा धनवे यांनी संस्थेच्या कार्याची माहिती देऊन पुरस्कार देण्यामागील उद्देश स्पष्ट केला. सूत्रसंचालन गजानन गायकवाड यांनी केले तर आभार एम.बी.साळवे यांनी व्यक्त केले.

Post a Comment