घोडेगाव :
नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचे काम चालू आहे पण कामावर कोणीही जबाबदार अधिकारी नसल्याने ठेकेदारानी कामात हातचलाखी चालू केली सरपंच राजेंद्र देसरडा उपसरपंच सौ सुनीता संदीप येळवंडे आणि काही सुज्ञ ग्रामस्थांनी कामाची पाहणी केली असता काम निकृष्ठ दिसले त्या मुळे ते काम बंद केले वरिष्ठणे लक्स घालून चौकशी करावी तो पर्यन्त काम बंद ठेवणार आहे तसे मा.जिल्हाधिकारी यांना ग्रामपचायतने पत्रा द्वारे कळविले आहे
रुग्णालायचे काम प्रगतीपथावर आहे परंतु कामावर सार्वजनिक बाधकाम विभागाचे कोणी ही नसल्याने कामाची ग्रामस्थांनी पहाणी केली असता अंदाज पत्रक ,इमारतीचा आराखडा या बाबत माहिती मिळत नाही बांधकामाच्या भरवामध्ये मुरूम दगडा ऐवजी काळी माती वापरली आहे तसेच सीमेंट काम ठिसुळ झाले आहे कामावर पाणी मारत नाही तसेच सोलीग कमी केली आहे त्या मुळे काम निकृष्ठ चालू आहे
सरपच देसारडा यांनी कामावर चौकशी केली तर कोणीही जबाबदार अधिकारी अथवा सुपरवायझर नसल्याने कामगारांना माहिती देता आली नाही सार्वजनिक बाधकामाचे अधिकारी निवडणूक काम सांगून जबाबदारी टाळत आहे तेव्हा आता वरिष्ठांनी पहाणी केल्याशिवाय निकृस्ठ काम बंद ठेवणार आहे असे सांगितले. कार्यकारी अभियंता यांनी लवकर पहाणी करावी अशी ग्रामस्थाची मागणी केली आहे

Post a Comment