विद्यार्थी उद्याचे भविष्य आहे - महापौर वाकळे



नगर-
येथील महर्षी प्रतिष्ठानच्या श्री साई  इंग्लिश मिडियम स्कुलचा वार्षिक पारितोषिक वितरण माउली सभागृहात महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी साहित्यिक लहू कानडे,संस्थेचे संस्थापक अशोक कानडे,सुनीता कानडे, एजुकेशन संचालक प्राचार्य नंदकिशोर  भावसार,शाळेच्या प्राचार्या  अर्चना झोपे,शर्मिला गोसावी,पालक प्रतिनिधी श्री व सौ वारे,सुरेखा सानपव सोनाली उगले,उपप्राचार्या माधवी जक्कल,मीना गायकवाड आदींसह मान्यवर, नागरिक पालक व विदयार्थी मोठ्या संख्नेने उपस्थित होते

कार्यक्रमाच्या प्रारंभी भारत मातेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.विद्यार्थिनींनी स्वागत गीते सादर केली, भावसार यांनी सन २०१८-१९  मध्ये शाळेच्या प्रगतीचा अहवाल, मिळालेले विद्यार्थ्यांचे यश ची माहिती देऊन पुढील वर्षी जून २०१९ पासून ११ विचा वर्ग सुरु करून ज्युनियर कॉलेजला प्रारंभ होत आहे असे सांगितले

महापौर वाकळे आपल्या भाषणात बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केलेकि भरपूर शिका व मोठे व्हा व शाळेचे,पालकांचे नाव मोठे करा,आजचे विद्यार्थी हे उद्याचे राष्ट्राचे भविष्य आहे,त्यांनी विविध क्षेत्रामध्ये यश मिळवावे यासाठी शुभेछया दिल्या

अशोक कानडे म्हणाले  परीक्षा संपल्यावर आम्ही पारितोषिक वितरण सभारंभ घेतो त्यामुळे या वेळी मुले रिलॅक्स असतात शाळा आम्ही एक सामाजिक अभियान म्हणून सुरु केलेली आहे

लहू कानडे म्हणाले शिक्षण हे व्यक्तिमत्व विकासाचे साधन आहे व शिक्षण म्हणजे शिकवणे नव्हे तर जो शिकू इच्छितो त्याला शिकण्यासाठी मदत करणे होय,शिक्षणातून अनेक कलाआत्मसात केल्या जातात असे सांगून त्यांनी दर्जेदार शिक्षण देण्याचे काम  श्री साई  इंग्लिश मिडियम स्कुलच्या माध्यमातून केले जाते असे ते म्हणाले

याप्रसंगी इ १ ली ते १० वि मधील सांस्कृतिक,क्रीडा स्पर्धा व शाळेत वर्गात गुणानुक्रमे प्रथम आलेले,विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे विद्यार्थी याना पारितोषिक देण्यात आले तसेच शाळेचा हेडबॉय आदित्य विश्व्कर्मा व हेडगर्ल खुशी पांचाल याना प्रदान करण्यात आले

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा खेडकर,अस्मिता घोरपडे,विनिता शेजूळ यांनी तर आभार  सचिता साळवे यांनी मानले,पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post