माय नगर वेब टीम
दहावी व बारावीच्या परीक्षा नुकत्याच संपल्या असून सध्या दहावी व बारावी नंतरचे अभ्यासक्रम कोणते आहेत, त्यामधून मिळणारा रोजगार कोणत्या स्वरूपाचा असू शकतो ह्या विचाराने विद्यार्थि व पालकही विचारात असतात . त्या -त्या शिक्षणाचा उद्देश काय आहे ह्या विषयी आपण सविस्तर माहिती पाहूया ..
प्रत्येकाच्या आयुष्यात करिअर महत्वाची भूमिका बजावत असते करिअर निवडणे हा जबाबदारीचा निर्णय आहे हा विदयार्थी व पालक यांच्यासाठी चिंतेचा विषय होऊन बसला आहे. करिअरचे विविध पर्याय उपलब्ध असल्याने नेमका कोणता पर्याय निवडावा हेच पालक विद्यार्थ्याना संभ्रमात टाकणारा विषय होऊन बसला आहे. त्या मुळे करीअर निवडताना विदयार्थी आणि पालकाना दुरदृष्टीने विचार करणे गरजेचे आहे.
‘सध्या अमुक क्षेत्रात चांगली संधी आहे ‘. किंवा माझ्या मित्राने अमुक शाखेत प्रवेश घेतला म्हणून मी ही त्याच शाखेत प्रवेश घ्यावा ‘ या आधारे करिअर निवडणे अडचणीचे व घाईचे ठरू शकते.
कोणते शिक्षण आपल्या पाल्यासाठी योग्य ठरू शकते हे सांगणे तसं कठीणच ! परंतु उपलब्ध शिक्षणाचे विविध अभ्यासक्रमाचे पर्याय निवडताना पुढील दहा वर्षाचा विचार करावा . त्या मधून मिळणारा भविष्यातील रोजगार त्याच बरोबर सध्याची राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय बाजार पेठेतील मागणी ,सामाजिक गरज ,पाल्याची आवड आदि घटकांचा विचार केल्यास १० वी किंवा १२ वी नंतर शिक्षण किंवा अभ्यासक्रम निवडताना योग्य दिशा मिळू शकते. व्यावसायिक अभ्यास क्रम हे रोजगराभिमुख असल्याने या अभ्यासक्रमाकडे वळणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे .
व्यावसायिक अभ्यासक्रमाची यादी खालील प्रमाणे ..
• तंत्रशिक्षण
• वैद्यकीय शिक्षण
• औषधनिर्माण शास्त्र शिक्षण
• नर्सिंग शिक्षण
• कृषी शिक्षण
• विधी शिक्षण व इतर शिक्षण
विविध क्षेत्रातील विविध अभ्यासक्रम आकडेवारी १० वी नंतर सर्व साधारण ११० डिप्लोमा इंजि. कोर्सेस उपलब्ध आहेत तसेच २०० विषयात विज्ञान शाखेतुन अभ्यासक्रम आपणास निवडता येतो १५० विषयात वाणिज्य शाखेतून व कला शाखेतून ३५० विषयात अभ्यासक्रम निवडू शकतो .
१० वी नंतर प्रत्येक पालकानी आपल्या पाल्याची कल चाचणी घेणे आवश्यक आहे जेणे करून पालकाना योग्य दिशा ठरवून पाल्यासाठी योग्य अभ्यासक्रम निवडता येईल. १० वी नंतर डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी कोणी प्रवेश घ्यावा ? तर ज्या पाल्याचे गणित व इंग्रजी विषयावर प्रभुत्व असेल त्यांनी डिप्लोमा अभ्यासक्रम निवडणे योग्य ठरेल असे मला वाटते.
करिअर निवडताना आपले ध्येय आपल्या डोळ्या समोर निश्चित असणे गरजेचे आहे .
१२ वी नंतर अभियांत्रिकी शाखा निवडताना .. .. ..
अभियांत्रिकी शाखेतील शाखेतील अभ्यासक्रम निवडायचे असल्यास १२ वी ला ( PCM)असणे आवश्यक आहे . अभियांत्रिकी शाखा निवडताना मूलभूत अभियांत्रिकी शाखा कोणत्या आहेत ही जाणून घेतल्यास पुष्कळ गोष्टी स्पष्ट होतील .
मूलभूत अभियंत्रिकी शाखा कोणत्या ही जाणून घेऊ ?
• स्थापत्य अभियांत्रिकी
• यंत्र अभियांत्रिकी
• विद्युत अभियांत्रिकी
• रसायन अभियांत्रिकी
• प्रॉडक्शन अभियांत्रिकी
• मरीन अभियांत्रिकी
• इलेट्रॉनिक्स अभियांत्रिकी
• संगणक अभियांत्रिकी
• इन्फॉर्मेशन टेक. आणि इतर शाखा
ह्या अभियांत्रिकी शाखेत प्रवेश घेण्यासाठी पात्रता
१२ वी ( फिजिक्स ,केमिस्ट्री , मॅथेमॅटिक्स )उत्ती र्ण असावे लागते . तसेच प्रवेशासाठी CET आणि JEE या दोन वेगवेगळ्या प्रवेश परीक्षा आहेत . CET ( Commen Entrance Test) ही राज्यस्तरावर घेतली जाते . तर JEE ( joint Entrance Examination )
ही परीक्षा राष्ट्रीय स्तरावर घेतली जाते .
• JEE main
• JEE Advance
राष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी संस्था (IIT-इंडियन इंस्टी टूट टेक्नॉलॉजी )आणि इतर नामांकित संस्थेत प्रवेश घेण्यासाठी घेतली जाते . १२ वी नंतर करीअर निवडताना (आय . आय . टी . ) क्षेत्राचा विचार होणे गरजेचे आहे . १२ वी ( पी . सी. एम .) विद्यार्थाना (बी. टेक .)पदवी शिक्षणास ही IIT-JEE ह्या प्रवेश परीक्षा मधून प्रवेश घेता येतो तसेच (एम . टेक . )ही पदव्युत्तर शिक्षण घेता येते . GATE (GRADUATE APTITUDE TEST ENGINEERING ) पात्र विद्यार्थ्याना प्रवेश मिळतो . IIT चे भारतात एकूण २३ शिक्षण संस्था कार्यरत आहेत . मुंबई ,दिल्ली , कानपूर ,मद्रास ,खरगपूर ,रूरकी गुवाहाटी इतर आहेत .
• JEE main आणि JEE Advance ही प्रवेश परीक्षा भारतातील अभियांत्रिकी क्षेत्रात करीअर करणाऱ्या विद्यार्थ्याना अत्यंत महत्वाची असते . विशेष भारतीय तंत्रज्ञान संस्था मध्ये प्रवेशासाठी ह्या दोन परीक्षा द्याव्या लागतात.
अभ्यासक्रम – ११ वी व १२ वी च्या CBSE अभ्यासक्रमवार आधारित आहे .
JEE MAIN पात्र झाले नंतर JEE ADVANCE प्रवेश परीक्षा देता येते . ही परीक्षा सखोल संकल्पना व प्रगत विचारावर घेतली जाते . तिची पातळी कठीण असते.
परीक्षा स्वरूप - JEE MAIN एकूण प्रश्न ७५ असतात आणि गुण ३०० असतात . ज्या विद्यार्थ्याना मेन्स मध्ये ९१% पेक्षा जास्त गुण मिळवणारे विदयार्थी JEE ADVANCE साठी पात्र ठरतात .
JEE ADVANCE ह्या परीक्षा मध्ये पेपर १ (१८६ ) आणि पेपर २ (१८६ ) असतात .
• MH-CET – ही प्रवेश परीक्षा महाराष्ट्रातील अभियांत्रिकी ,फार्मसी ,आणि कृषी क्षेत्रातील अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवण्यासाठी घेतली जाणारी परीक्षा आहे .
अभ्यासक्रम – ११ वी व १२ वी च्या महाराष्ट्र राज्य मंडळाचा अभ्यासक्रमवार आधारित आहे .
परीक्षा स्वरूप - ह्या प्रवेश परीक्षेत दोन पेपर घेतले जातात .
पेपर १ ( गणित ) ५० प्रश्न गुण १०० पेपर २ ( भौतिक शस्त्र ,रसायन शास्त्र ) १०० प्रश्न गुण १०० महत्वाचे ह्या मध्ये कोणतेही निगेटीव मार्क प्रणाली नाही
• IIT पदव्युत्तर व्यस्थापन शिक्षण – स्कूल ऑफ मॅनेजमेंट आय आय टी तर्फे दोन वर्षे कालावधीचा व्यवस्थापन पदव्युत्तर शिक्षणाची सोय आहे .
• पात्रता – प्रथम श्रेणीत पदवी प्राप्त
• निवड – IIM तर्फे घेण्यात येणाऱ्या कॅट परीक्षेतीळ गुणांकन नुसार निवड केली जाते .
• IISER (INDIAN INSTITUTE OF SCIENCE EDUCATION AND RESEARCH EXAM ) आयशर मधील शिक्षण संस्था मध्ये प्रवेश –
१२ वी शास्त्र उतीर्ण उमेव्दाराना उच्चतम संशोधन संस्था मध्ये प्रवेश घेता येतो . भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था ह्या संस्थेत प्रवेश घेण्यासाठी ( IAT) हि अभियोग्यता चाचणी उतीर्ण व्हावे लागते . ह्यानंतर भारतातील सात (७ )भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था मध्ये प्रवेश घेता येतो . हि प्रवेश परीक्षा ( CBT) बेस असते . ह्या मध्ये PCMBह्या विषयावर आधरित प्रश्न असत्तात . महाराष्ट्र मधील पुणे येथे हि संस्था आहे .येथे १२ वी नंतर बी.एस . आणि एम.एस . ह्या दोन्ही अभ्यासक्रमाचा समावेश होतो .
बीएस.व एम.एस . दुहेरी पाच वर्षे कालावधी अभ्यासक्रम राबविला जातो .अधिक माहिती साठी
www.iiserpune.ac .in या संकेत स्थळाचा संदर्भ घ्यावा .
ह्यावर्षी हि २५ मे २०२५ रोजी संपन्न होत आहे .
भारतातील सात (७ )नामवंत संस्था खालीलप्रमाणे आहेत .
• IISER PUNE MAHARASHTRA
• IISER BHOPAL MADHYAPRADESH
• IISER MOHALI PANJAB
• IISER KOLKATTA WEST BANGAL
• IISER TIRUPATI ANDRAPRADESH
• IISER TURUVNANTPURAM KERAL
• IISER BERHAMPUR ODISA
वरील सर्व संशोधन संस्था मध्ये खालील अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला जातो
• BAILOGCAL SCIENCES
• CHEMICAL SCIENCES
• EARTH AND ENVIROMENTAL SCIENCES
• MATHEMATICAL SCIENCES
• PHYSICAL SCIENCES
• ECONOMICAL SCIENCES
• NISER (NATIONAL INSTITUTE OF SCIENCE EDUCATION AND RESEARCH EXAM )
१२ वी शास्त्र उतीर्ण उमेव्दाराना उच्चतम संशोधन संस्था मध्ये प्रवेश घेता येतो . राष्ट्रीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था भुवनेश्वर ह्या संस्थेत प्रवेश घेण्यासाठी ( NEST) हि चाचणी उतीर्ण व्हावे लागते .
अधिक माहिती साठी हे संकेनतस्थळ www.niser.ac.in/वापरा .
▪ ऑटोमेशन इंजिनिअरींग – (Automation engineering )
सुरुवातीच्या काळात अभियांत्रिकी उत्पादन प्रक्रिया किंवा प्रणाली ऑटोमेशन हि एक गुंतागुंती प्रक्रिया होती . यामध्ये मॅकेनिकल , इलेट्रिकल , इन्स्ट्रुमेटेशन घटकाचा प्रामुख्याने समावेश होत असे
प्रोग्राम कंट्रोल चा शोध व वापराने ऑटोमेशन क्षेत्रात प्रचंड प्रमाणात प्रगती घडून आली आहे .
सध्या विविध प्रकारची ऑटो मेशन टू ल्स उद्योगामध्ये वापरली जातात .
• ANN ( ARTIFISIAL NURAL NETWORK )
• DCS (DISTRIBUTED CONTROLE SYSTEM )
• HMI (HUMAN MACHIN INTERFACE)
• ROBOTICS
• MOTION CONTROLE
• INSTRUMENTION
ऑटोमेशन ही सर्वच उद्योगांची जीवन रेषा बनली आहे . ऑटोमेशन कॅन्सल्टन्सी व डिझाईन या सेवा व्यवसाय सह स्वयंरोजगाराची मोठी संधी उपलब्ध आहे .
▪ मर्चंट नेव्ही (MERCHANT NEVY)
सरकारी व मान्यता प्राप्त खाजगी प्रशिक्षण संस्थांद्वारे बारावी (शास्त्र )मरीन इंजीनियरिंग किंवा बी एस (नॉटिकल सायन्स उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मर्चंट नेव्ही मध्ये प्रवेश मिळतो.
• नेव्हिगेशन
• इंजीनियरिंग
ह्या क्षेत्रामध्ये करिअर करण्याची संधी आहे मरीन इंजीनियरिंग क्षेत्र विषयक प्रशिक्षण देणाऱ्या संस्था खालील आहे.
1) ट्रेनिंग शिप चाणक्य मुंबई
2) MERI कोलकत्ता
3) LBS Advanced मेरी टाइम स्टडीज अँड रिसर्च मुंबई
संकेतस्थळ -www.jmv.edu.in
यावरती सर्व माहिती उपलब्ध होईल
▪ वैमानिक प्रशिक्षण (PILOT TRAINNING)
(IGRUA)
इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डाण अकॅडमी ही एव्हिएशन ट्रेनिंग मध्ये जागतिक दर्जाची संस्था आहे ज्यांना पायलट बनण्याची किंवा करिअर करण्याची इच्छा आहे ते येथे प्रवेश घेऊ शकतात येथे वैमानिक प्रशिक्षण दिले जाते.
पात्रता - बारावी शास्त्र PCM इंग्रजी विषयासह उत्तीर्ण आवश्यक
वय - प्रवेशाच्या वेळी 17 वर्षे असावे.
निवड - ऑनलाइन परीक्षा मुलाखत PAT अशा तीन टप्प्यातून जावे लागते.
महाराष्ट्रात नागपूर येथे सरकारी प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आहे. संस्थेचे नाव नागपूर फ्लाईंग क्लब एकूण 7 संस्था महाराष्ट्रात कार्यरत आहेत.
सार्वजनिक विमान वाहतूक कंपन्या( एअर सहारा,जेट, एअरवेज इंडिया,गो इयर इत्यादी आहेत या कंपन्यांमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळते.
संकेतस्थळ अधिक माहितीसाठी www.dgca.nic.in
▪ संरक्षण दलातील करिअर
आर्मी,नेव्ही आणि एअर फोर्स या तीन क्षेत्रात अधिकारी तयार करण्याचे काम महाराष्ट्रातील (NDA पुणे )करते. 12 वी नंतर भारतीय संरक्षण दलामध्ये अधिकारी म्हणून देश सेवा करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी UPSC परीक्षेद्वारे NDA चा पर्याय हा मार्ग आहे.
UPSC मार्फत NDA-1 आणि NDA -2 अशा दोन वेळा लेखी परीक्षा घेतली जाते ह्या परीक्षा एप्रिल व सप्टेंबर महिन्यात होतात. परीक्षांमध्ये गणित व सामान्य क्षमता चाचणी असे दोन पेपर असतात एकूण 900 गुणांची लेखी परीक्षा एकाच दिवशी महाराष्ट्र व नागपूर या केंद्रांवर आयोजित केली जाते.
वय - 16 वर्षे ते 19 वर्षे दरम्यान असावे.
▪ SSB ( सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड) मुलाखत
SSB मुलाखत तीन वेगवेगळ्या चाचणीमध्ये विभागली जाते.
1) मानसिक चाचणी
2) समूह चाचणी
3) वैयक्तिक मुलाखत
SSB मुलाखत एकूण 900 गुणांची असते.SSB मुलाखत उत्तीर्ण उमेदवारांची सेना वैद्यकीय अधिकारी बोर्ड मार्फत वैद्यकीय चाचणी घेतली जाते.
▪ NDA प्रशिक्षण
NDA शिक्षण व प्रशिक्षण सहा क्रेडिट मध्ये जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा B. Sc /B.A B. Sc. (C. S.)हा पदवी अभ्यासक्रम प्रशिक्षणा दरम्यान पूर्ण केला जातो.
• IMA - डेहराडून
• INA - कोची
• IAA - हैद्राबाद
येथील प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर 'कमिशन्ड ऑफिसर' बनतो.
▪ अवकाश संशोधन क्षेत्रातील करिअर -
अवकाश कार्यक्रम व मोहिमा राबवण्यासाठी अवकाश विभागाच्या अख्यारीत भारतीय अवकाश संस्थेची स्थापना करण्यात आली. इस्रो ( Indian Space Research Organisation) या क्षेत्रात करिअर करण्याची संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. इस्रो मध्ये अभियांत्रिकी पदवी किंवा शास्त्र शाखेतील पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता असणाऱ्या उमेदवारांना शास्त्रज्ञ किंवा अभियंता म्हणून करिअर करता येते.
▪ इस्रोमध्ये
• एरोनॉटिक्स सायन्स
• ऑटोमोस्फियरिक सायन्स
• केमिकल सायन्स
• इलेक्ट्रो ऑप्टिक सायन्स
• इलेक्ट्रॉनिक सायन्स
• जिओलॉजी सायन्स
• मटेरियल सायन्स
• स्पेस सायन्स
अशा अनेक क्षेत्रात अधिकारी पदावर करियर करण्याची संधी मिळते.
इस्रो मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी (IIST)भारतीय अंतरिक्ष शास्त्र व तंत्रज्ञान संस्था केरळ येथे आहे. येथे बी टेक एरोस्पेस इंजीनियरिंग बी टेक ( एव्हानिक्स इंजीनियरिंग ) आणि दुहेरी पदवी अभ्यासक्रम देखील चालवला जातो.
तसेच मास्टर ऑफ सायन्स खालील क्षेत्रामध्ये देखील करता येते.
1) एम एस ( एस्ट्रॉनॉमी अँड ऍस्ट्रो फिजिक्स )
2) एम एस ( सॉलिड स्टेट फिजिक्स )
यावरील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी JEE ( ADVANCE) परीक्षा मार्फत पात्र व्हावे लागते. खाजगी व सरकारी विद्या शाखा मधील संशोधन व विकास कार्यात करियर करता येते.
• करियर व्यवस्थापनातील दोन घटक विद्यार्थी व पालक
विद्यार्थी पाल्यांची शिक्षण व करियर नियोजन या साऱ्या प्रक्रियेत पालकांचा सहभाग किती असावा? हा प्रश्न सातत्याने विचारला जाणारा आहे. तसे पाहता कौटुंबिक जबाबदारी पालकांचीच असते हे आपणास मान्य करावं लागेल. मुलांच्या उच्च शिक्षण - करियर निवड यामध्ये पालकांची मार्गदर्शकाची भूमिका महत्त्वाची ठरते. पालकांनी अनुभव परिस्थिती याचा अंदाज घेत मार्गदर्शन करायला हवे. आपल्या मुलाचा कल,त्याची बौद्धिक आवड, प्रयत्नशीलता,चिकाटी इत्यादी बाबींचा वस्तुनिष्ठ विचार करून पालकांचे मार्गदर्शन पूरक ठरेल.
संकलन व लेखन
श्री महादेव जालिंदर वाघ
(M.A. B.Sc. B.Ed. D.C.A. D.Jr. D.T.L.& B.A.)
MOB NO - 9765370207
Post a Comment