हजारोंच्या उपस्थितीत मढी येथे शनिवारी हिंदू धर्मसभा संपन्न
माय नगर वेब टीम
अहिल्यानगर - नाथांची पंढरी असलेल्या मढी गावाच्या ग्रामपंचायतीने घेतलेला निर्णयाने इतिहासात रचनारा आहे. या गावाने जिहाद्यांना त्यांची जागा दाखवण्या साठी योग्यच निर्णय घेतला आहे. त्यांनी जर हिंदू धर्माला तरीही आव्हान दिले तर मढी गावा सारखा असा ऐतिहासिक निर्णय भविष्यात संपूर्ण महाराष्ट्रभर घेतला जाईल, असा इशारा राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नीतेश राणे यांनी दिला. ते मढी गावात हिंदू धर्म सभेत बोलत होते. ते म्हणाले, राज्यभर या समाज्यातील लोकांनी केलेले अतिक्रमण काढली जात आहेत. जो धर्म जिहादी आहे, त्यांच्यात मूर्तीपूजेला विरोध आहे, त्या लोकांना आपल्या यात्रेत दुकाने का लावू द्यावी? असा सवाल करत तुम्हाला जर आमच्या पवित्र धार्मिक ठिकाणी येऊन तुम्हाला जिहाद करायचा असेल तर आम्ही ते सहन करणार नाही. या यात्रेत त्यांना दुकाने लाऊ देणार नाही असा निश्चय करण्यासाठी मंत्री राणी यांनी उपस्थित हिंदू नागरिकांना मोबाईलचा लाईट लावण्यास सांगितले.
मढी गावातील यात्रेत मुस्लीम समाज्याच्या नागरिकांनी दुकाने लावू न देण्याचा निर्णय अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मढी ग्रामपंचायतीने घेतला होता. यावरून मोठा वाद निर्माण झाला असल्याने राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नीतेश राणे यांनी मढी
ग्रामपंचायतीच्या या निर्णयाचे समर्थन करण्यासाठी शनिवारी मढी गावात हिंदू धर्म सभा घेतली. यावेळी अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप, श्रीरामपूरचे हिंदुत्ववादी कार्यकर्ते सागर बेग, हभप आदिनाथ महराज शास्त्री व हभप अशोक पालवे महाराज, मढी गावचे सरपंच संजय मरकड आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी मढी पंचोक्रोशी तील नागरिकांसह अहिल्यानगर शहरातील हिंदू कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी हिंदूत्ववादाच्या जोरदार घोषणा दिल्या.
मंत्री राणे पुढे म्हणाले, मढी ग्रामपंचायतीने घेतलेला निर्णय ऐतिहासिक आहे. जिहाद्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी गावातील हिंदू जागृत झालेआहेत. देशाला व महासराष्ट्राला दिशा देणारा मढी गावाचा निर्णय आहे. मढी ग्रामपंचायत ने घेतलेला निर्णय रद्द करणाऱ्या गटविकास अधिकाऱ्याला कळू द्या या गावाच्या मागे राज्यातील हिंदुत्ववादी सरकार आहे. असे ठणकावून सांगत ते म्हणाले, आम्ही तुमच्या धर्माच्या विरोधात जाहीरपणे भूमिका घेतली तर तुम्हाला चालेल का?, रामगिरी महाराजांनी सत्य सांगितल्यावर तुम्हाला मिर्चा का झोंबतात? असा सवालही नीतेश राणे यांनी उपस्थित केला.
हिंदू धर्माला जर आव्हान देण्याचे काम या जिहाद्यांनी केले तर मढी गावाने जो निर्णय घेतलाय तो निर्णय भविष्यात पूर्ण महाराष्ट्रभर घेतला जाईल, असा इशाराही मंत्री राणे यांनी दिला.राज्यातील हिंदू जनतेने मतदान केले म्हणूनच आम्ही आमदार, मंत्री झालो. राज्यात आता हिंदुत्ववादी सरकार आहे, त्यामुळे हे सरकार राज्यातील हिंदूंच्या मागे उभे आहे. मढी गावचा ठराव जरी बीडीओ ने रद्द केलाअसला तरी पुन्हा ग्रामसभा घेऊन नव्याने ठराव करा आणि सर्व ग्रामस्थांनी त्या ठरावावर सह्या करा. सर्व ग्रामस्थांनी ठरावावर सह्या केल्यावर मी बघतो बीडीओ कसा हा ठराव रद्द करतो, असेही नीतेश राणे म्हणाले.
आ.संग्राम जगताप म्हणाले, सर्व जनतेचे श्रद्धास्थान असलेले मढी देवस्थान हे शेकडो वर्षांपासून या ठिकाणी आहे या जागेवर वक्फ बोर्डाने दावा केला आहे. तसेच अनेक आपल्या धर्मीक स्थळांवर, नगरच्या कोतवाली पोलीस स्टेशनच्या जागेवरही त्यांनी दावा केला आहे. उद्या आपल्या घरावरही ते दावा करतील. तू
त्यामुळेच आता त्यांना आपली ताकद दाखवून देण्याची वेळ आली आहे. मढी ग्रामपंचायतीने त्यांना लांब ठेवण्याचा घेतलेला निर्णय योग्यच आहे. ही सुलेमान वळवळ ठेचवीच लागेल. भाईचाऱ्याची भाषा ते करत आहेत, भाईचार फ़क्त आम्हीच करायचा आणि तुम्ही जिहाद करायचा. त्यामुळे आजच त्यांना थांबवले नाहीतर आपली पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. आपले आराध्य छत्रपती संभाजी महाराजांना त्या औरंग्याने तडफडून मारले आहे. त्या औरंग्याचे थडगे कशासाठी ठेवायचे ? ते आपल्याला उखडून टाकायचे आहे. मढीच्या ठरवला समर्थन देण्यासाठी जसे हजारो हिंदू येथे आले. तसे ते थडगे उखडण्यासाठी लाखो हिंदू एकत्र येणे आवश्यक आहे, असे आवाहन त्यांनी करत मंत्री राणे याठिकाणी उपस्थित राहून समर्थन दिल्याबद्दल आभार मानले.
यावेळी मढी चे सरपंच संजय मरकड यांनी मढी गावाची परिस्थिती सांगून येथे होणाऱ्या जत्रेत मुस्लिम समाज कसा जिहाद करतो याची माहिती दिली. या जिहादा मुळेच ग्रामपंचायतीने हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.
यावेळी सागर बेग, आदिनाथ महाराज शास्त्री यांनीही मनोगत व्यक्त करत मढी गावाच्या निर्णयाचे समर्थन केले.
Post a Comment