मनसेची पाचवी यादी जाहीर; ‘या’ १५ जणांना संधी!



माय नगर वेब टीम 

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे. या पाचव्या यादीत १५ जणांची नावे जाहीर करण्यात आली असून आतापर्यंत ७८ जणांना उमेदवारी देण्यात आली आहे.


ही यादी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जाहीर केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यावेळी विधानसभा निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी केली आहे. २० नोव्हेंबरला महाराष्ट्रात निवडणूक पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. राज ठाकरेंनी महाराष्ट्राचा दौरा केला. तसंच या वेळी आपण २०० ते २२५ जागा लढणार आहोत असं त्यांनी जाहीर केलं होतं. त्यानुसार आता ही नावं समोर येत आहेत.



0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post