*घटस्थापना ते कोजागिरी पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन
माय नगर वेब टीम
अहमदनगर - नगर तालुक्यातील घोसपुरी येथील जागृत देवस्थान असलेल्या पद्मावती माता मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची मोठ्या उत्साहात तयारी सुरू आहे. श्री क्षेत्र माहूरगड येथून पायी ज्योत आणण्यासाठी येथील भाविक रवाना झाले आहेत. आश्विन शुद्ध प्रतिपदा ते कोजागिरी पौर्णिमा दरम्यान (दि.३ ऑक्टोबर ते १६ ऑक्टोबर) येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवारी (दि.३ ऑक्टोबर) श्री श्रेत्र माहूरगड येथून आणलेल्या ज्योतीची गावातून मिरवणूक काढून मातेची पुजा करून मोठ्या उत्साहात घटस्थापना करुन शारदीय नवरात्रोत्सास प्रारंभ होईल. या कालावधीत दररोज पहाटे काकडा आरती, पुजा, सकाळी ९.३०,संध्याकाळी ७ ३० महाआरती, देवीचे गीत, देवीचा गोंधळ, गीते, ऑर्केष्ट्रा, तसेच गावातील जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
गुरुवारी (दि.३) रात्री ९ ते १२ या वेळेत घोसपुरी व पंचक्रोशीतील आराधी मेळा, शुक्रवारी (दि.४)रात्री घोडकेवाडी, मोळवस्ती, कवडे वस्ती, हंडोरे मळा, खोबरे वस्ती जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांचा सांकृतिक कार्यक्रम, शनिवारी (दि.५) रात्री न्यु होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा, रविवारी (दि.६) रात्री भजनसम्राट बाळासाहेब वाईकर यांचे संगीत भजन, सोमवारी (दि.७) रात्री सुधाकर मधुकर सरोदे यांचा देवीचा गोंधळ, मंगळवारी (दि.८) रात्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोसपुरीच्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम, बुधवारी (दि.९) रात्री सुधाकर मधुकर सरोदे यांचा देवीचा गोंधळ, गुरुवारी (दि.१०) रात्री घोसपुरी व पंचक्रोशीतील भजनी मंडळाचे भजन, शुक्रवारी (दि.११)दुपारी १२.४५ वाजता महानवमी पूजा व होम हवन, रात्री ९ ते ११.३० या वेळेत सुधाकर मधुकर सरोदे यांचा देवीचा गोंधळ, शनिवारी (दि.१२) सायंकाळी ५.३० वाजता विजया दशमी निमित्त पालखी मिरवणूक तसेच बुधवार दि.१६ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रात्री ९ ते १२ यावेळेत सुधाकर मधुकर सरोदे यांचा देवीचा गोंधळाचा कार्यक्रम होईल.
*महानवमीच्या दिवशी यात्रोत्सव*
महानवमीच्या दिवशी शुक्रवारी दि.११ ऑक्टोबर रोजी होम हवन कार्यक्रम होणार आहे. होमाला देवीचा मोठा यात्रोत्सव असतो. या दिवशी भाविकांची गर्दी लक्षणीय असते. पहील्याच दिवसापासुन भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते. परिसरातील वाळकी, खडकी, अकोळनेर, सारोळा कासार, अरणगाव, हिवरे झरे, बाबुर्डी बेंद, खंडाळा येथून अनेक भाविक पहाटे पासूनच पायी दर्शनासाठी येतात. जिल्हात व जिल्हयाबाहेर ही देवीचे मोठ्या प्रमाणात भाविक आहेत. उत्सवानिमित्त मंदीर परिसरात चोख व्यवस्था करण्यात येत आहे.
Post a Comment