माय नगर वेब टीम
अहमदनगर - नवनागापूर ग्रामपंचायत ने सुरू केलेल्या नागरी सुविधा केंद्राचा नागरीकांना फायदा होणार आहे.येथील लोकसंख्या पाहता घनकचरा, स्ट्रीट लाईट साठी सोलर प्रकल्प तसेच दोन कोटी रुपायाचे सांस्कृतिक भवनचा प्रश्न आचारसंहिता लागण्याच्या आत मंजुर करणार असल्याचे दक्षिण मतदार संघाचे खा.निलेश लके यांनी सांगीतले.
नवनागापूर ( ता. नगर ) येथे ग्रामनिधी व ग्रामस्वरात अभियान अंतर्गत ग्रामपंचायत बैठक हॉल व नागरी सुविधा केंद्र इमारतीचा शुभारंभ खासदार निलेश लंके यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री पोपटराव पवार, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष प्रताप शेळके, माजी जिल्हा परीषद सदस्य माधवराव लामखडे, विलासराव आठरे, सरपंच डॉ. बबनराव डोंगरे, उपसरपंच संगिता सप्रे उपास्थित होते. यावेळी पोपटराव पवार म्हणाले दिवसो दिवस आपल्याला वेगवेगळ्या कामासाठी अनेक प्रकारचे दाखल्याची गरज पडले. सर्व दाखले आता आपल्या नागरी सुविधा केंद्राच्या माध्यमातून मिळणार आहे. ग्रामपंचायत आरोग्य , शिक्षण, पर्यावरण ,पाणी यासारख्या सुविधा ग्रामपंचायत च्या माध्यमातून मिळत आहे.
डॉ. बबनराव डोंगरे, ग्रामसेवक संजय मिसाळ यांच्या कडे गाव सुधारण्याचे चांगले व्हिजन आहे सुविधा देण्यासाठी चांगली यंत्रणा असली पाहिजे ती या ग्रामपंचायत कडे आहे हे यावरून दिसते एमआय डिसी मुळे लोकसंख्या जास्त आहे तरी नागरी सुविधा पुरविण्याचे काम ग्रामपंचायत करत असल्याचे दिसते. २०११ च्या जनगणनेनुसार निधी मिळत आहे आज चार ते पाच पट लोकसंख्या वाढली असल्यामुळे त्याचा अतिरिक्त भार ग्रामपंचायतीवर पडत आहे तरी सुध्दा ग्रामपंचायत नागरी सुविधा देत आहे.केंद्र व राज्य सरकार योजना जिल्हा परीषद कडून ग्रामपंचायत पर्यत येतात ग्रामपंचायत सुविधा पुरवते. नागरी सुविधा देण्याची जबाबदारी सरकारची आहे त्यांची अमंलबजावणी करणे ग्रामपंचायतचे काम आहे.
यावेळी डॉ बबनराव डोंगरे यांनी लोकसंख्या जास्त असल्यामुळे कचरा समस्या मोठया प्रमाणात आहे त्यासाठी कचरा प्रकल्प चा ५श्न मार्गी लावावा. तसेच पाच हजार युनिट तयार होईल असा सोलर प्रकल्प व सांस्कृतिक भवनाचे काम मार्ग लावावे अशी मागणी खा. निलेश लंके यांच्या कडे केली. विधानसभेच्या निवडणुकीत सर्वात जास्त लिड देणार असल्याचे डॉ. डोंगरे यांनी यावेळी सांगीतले.
या कार्यक्रमासाठी रोहीदास कर्डीले, रघुनाथ झिने, सुनंदा डोंगरे, गोरक्षनाथ ग०हाणे, मंगल गोरे, संगीता भापकर, अमोल सप्रे, रंजना दांगट, कल्पना गिते, अर्जुन सोनवणे, सत्यभामा डोंगरे, हेम चव्हाण सुशिला जगताप, सुमन सप्रे, स्वाती औटी, गणेश आगळे,भानुदास सातपुते, बाबा डोंगरे, बाबा शेवाळे, संजय चव्हाण, बाबा दांगट,धनजंय. सप्रे, भिमराज गव्हाणे, संतोष गव्हाणे, नवनाथ गव्हाणे, सुभाष ढेपे, रोहीदास केदार, भगवान श्रीराम, दिपक खुळे, नाना डोंगरे चार्लस खंडागळे, अमित चौधरी, राजू ढेपे, राजू आढाव, मोहन गिते, अशोक वांरगुळे, बाबासाहेब गायकवाड, सतिष शिंदे चंद्रभान डोंगरे, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका,शिक्षक वर्ग, माजी सैनिक सह ग्रामस्थ उपस्थित होते.
Post a Comment