अल्पवयीन मुलांची धिंड प्रकरणी काँग्रेस पदाधिकारी गितेसह चार जणांना पोलीस कोठडीमाय नगर वेब टीम 

अहमदनगर : नगरमध्ये वारंवार कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या घटना घडत आहेत. नवनागापूर   परिसरात अल्पवयीन तरुणांची धिंड काढल्याची माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. यात  युवक काँग्रेसचा पदाधिकारी प्रवीण गीते यासह १२ जनांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान एमआयडीसी पोलिसांनी चार जणांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

पीडित अल्पवयीन फिर्यादी मुलाच्या जबाबा वरून एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. युवक काँग्रेसचा पदाधिकारी प्रवीण गीते याच्यासह राहुल पाटील, प्रशांत वंजारे, विशाल काटे, हर्षल गायकवाड, सोनू शेख, करण काळे, आर्यन शेवाळे, सागर दारकुंडे, सुरज शिंदे, रोहित (पूर्ण नाव माहित नाही), पप्पू पगारे यांच्यावर भादवि 452, 323, 324, 504, 506, 147, 149 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

घडलेला प्रकार एवढा भयावह होता ही आरोपींच्या हातामध्ये लोखंडी रॉड, लोखंडी कोयता, कुऱ्हाडीचे दांडके होते. नवनागापूर परिसरातील वैजनाथ कॉलनी या ठिकाणी भर दिवसा दुपारी साडेबारा वाजता हा हृदयद्रावक प्रकार घडला. या हल्ल्यात घरातील महिलांना देखील मारहाण करण्यात आली आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली होती. दरम्यान पोलिसांनी काँग्रेस पदाधिकारी प्रवीण शरद गिते, विशाल काटे, विशाल कापरे, हर्षल गायकवाड, यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

काँग्रेस पदाधिकारी प्रवीण गितेवर पक्षश्रेष्ठी कारवाई करणार का? 

दरम्यान, गुन्हेगारांना राजकीय अभय मिळत असेल आणि ते त्या अडून समाजात धूडगुस घालत असतील तर अशांवर आता काँग्रेस पक्ष काय कारवाई करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. नगर शहरात कायम गुंडगिरीवर आरोप करणाऱ्या काँग्रेसच्याच युवक पदाधिकाऱ्याने केलेले अशोभनीय गुन्हेगारी कृत्य समोर आल्यामुळे आता याबाबत शहर काँग्रेस काय भूमिका घेणार हे पाहणे आता महत्वाचे आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post