राष्ट्रवादीच्या नगर तालुकाध्यक्षपदी अशोक कोकाटे ; कोणी कोणी केला सत्कार, काय म्हणाले नूतन तालुकाध्यक्ष, पहा...



माय अहमदनगर वेब टीम 

अहमदनगर -नगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) तालुका अध्यक्षपदी चिचोंडी पाटीलचे अशोक कोकाटे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने तसेच बबनराव शेळके मित्र मंडळ व युवा सेना शिवसेना नगर तालुक्याच्या वतीने सन्मान करण्यात आला.

कोकाटे यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष व कार्याध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. तसेच संजय गांधी निराधार अनुदान योजना व स्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून कोरोना काळात अनेक सामाजिक कामे केलेली आहेत. याच कार्याची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नहाटा यांनी त्यांना तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. यावेळी बोलताना कोकाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विचार तळागाळातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे तसेच पक्ष संघटन मजबूत करण्याचे कार्य पुढील काळात करणार असल्याचे सांगितले. यावेळी मार्केट कमिटीचे मा. संचालक बाजीराव हजारे स्मृती प्रतिष्ठानचे मार्गदर्शक सुनील कोकाटे, भाजपा पंचायतराज व ग्राम विकास विभाग उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष बबनराव शेळके, युवा सेना शिवसेना तालुका अध्यक्ष सचिन ठोंबरे, पांडुरंग ससे, अमित बोरा, भाऊसाहेब ठोंबरे, दिपक हजारे, गणेश इंगळे, शरद थोरे, लहानु वाडेकर, कैलास खांदवे, हनुमंत कोकाटे, सतीश शेळके, बाळासाहेब कोकाटे, दत्ता धलपे, बंडू खराडे, महादेव खडके, अंबादास कोकाटे, देविदास शेळके, विलास खांदवे, सतीश कोकाटे, नितीन खडके, अंबादास शेळके, शाम कोकाटे, संतोष कोकाटे, हनुमंत खेडकर, सचिन खडके, राघू कोकाटे, विकास कोकाटे, पांडुरंग चव्हाण, मच्छिंद्र वाडेकर, संदीप कोकाटे, निलेश पंडित, विजय देवकर, शशी मांढरे, संभाजी खडके, आबा वाडेकर, सचिन दानवे इत्यादी तरुण वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवडीचे नगर तालुक्याच्या विविध स्तरातून स्वागत होत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post