मराठ्यांनो 'त्यांना' निवडणुकीत पाडा; . 'स्वतः मोठ होऊन गोरगरिबांच्या पोटावर पाय देणे हा त्यांचा धंदा, मनोज जरांगे पाटील अजून काय म्हणाले पहा..

 


माय अहमदनगर वेब टीम 

पुणे - मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लढणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सध्या राज्यभर दौरा करत आहेत. पुणे दौऱ्यानंतर आज मनोज जरांगे-पाटील यांनी नाशिक दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी मराठा आरक्षणावरून आधीच्या महाविकास आघाडी सरकारसोबत आताच्या महायुतीच्या सरकारवर देखील टीका केली. त्याचसोबत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावरही टीका केली. 'स्वतः मोठ होऊन गोरगरिबांच्या पोटावर पाय देणे हा त्यांचा धंदा आहे.', असं म्हणत मनोज जरांगे-पाटील यांनी भुजबळांवर निशाणा साधला.


मनोज जरांगे-पाटील आणि छगन भुजबळ हे नेहमीच एकमेकांवर आरोप करत असतात. मनोज जरांगे-पाटील यांनी आरक्षणादरम्यान उपोषण केले होते. तेव्हापासून भुजबळ आणि जरांगे-पाटील एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. अशातच जरांगे-पाटील यांनी नाशिक दौऱ्यादरम्यान भुजबळ यांच्यावर बोचरी टीका केली. माध्यमांशी संवाद साधताना जरांगे पाटील म्हणाले की, 'निवडणुकीला उभे राहणं भुजबळांचा धंदा आहे. स्वतः मोठ होऊन गोरगरिबांच्या पोटावर पाय देणे हा त्यांचा धंदा आहे.'


'आमच्या नोंदी ओबीसीमध्ये सापडल्या. भुजबळ किती दिवस खोटं बोलणार आहे. आमच्या ५७ लाख नोंदी सापडल्या याचा अर्थ मराठा समाज ओबीसीमध्ये आहे. तू विरोध करत रहा मी मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण घेऊन दाखवणार.', असं म्हणत मनोज जरांगे-पाटील यांनी यांनी छगन भुजबळ यांना इशारा दिला. तसंच, भुजबळ यांना दिल्लीतून काय की अमेरिकेतून काय कुठून पण पाठिंबा येऊ द्या. मला त्याचं काय करायचं.', असं देखील ते म्हणाले.


मनोज जरांगे-पाटील यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील टीका केली. ते म्हणाले की, 'सगळे जण सारखेच तिघांनी बनून षडयंत्र केलंय. किती दिवस मराठ्यांची फसवणूक करणार आहेत. मागच्या काळात आमचा महाविकास आघाडीने कार्यक्रम केला आणि आता यांनी केला. या दोघांना निवडणुकीत पाडा. मराठ्यांनो निवडणुकीला उभं राहण्यापेक्षा यांना पाडा. पाडण्यात सुद्धा विजय असतो.', असे ते म्हणाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post