मोठी बातमी : उड्डाणपुलाचा भाग कोसळून गंभीर दुर्घटना, गाडीचे नुकसान पण जीव वाचला...




उड्डाणपुलाच्या कामाचे श्रेय घेणाऱ्यांनी निकृष्ट कामाचे श्रेय घ्यावे -शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे 

माय अहमदनगर वेब टीम 

अहमदनगर : नगर शहरातील बहुचर्चित उड्डाणपूला खाली सोमवारी रात्री गंभीर दुर्घटना घडली. सुदैवाने यात कोणाला दुखापत अथवा जीवित हानी झाली नाही. मात्र अचानक उड्डाणपुलाचा एक हिस्सा कोसळल्यामुळे खालून जाणाऱ्या चार चाकी वाहनाची काच फुटली. घटना समजतात शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे कार्यकर्त्यांसह घटनास्थळी पोहोचले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी दुर्घटनाग्रस्त गाडी चालकाला मदत केली. उड्डाणपुलाचे श्रेय घेणाऱ्यांनी या निकृष्ट कामाचे देखील आता श्रेय घ्यावे, अशी घणाघाती टीका यावेळी फेसबुक लाईक करत शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केली आहे. 



यावेळी काळे यांच्या समवेत काँग्रेसचे पदाधिकारी चंद्रकांत उजागरे, विलास उबाळे, अनिस चुडीवाला, अभिनय गायकवाड इंजि. सुजित क्षेत्रे, बाबासाहेब वैरागर आदी उपस्थित होते. 


घडले असे की, उड्डाणपुलाचा मालबा अचानक कोसळला. त्यावेळी एक दुचाकी स्वार मागून येत होता. त्याने गाडी डावीकडे घातली. तो देखील अपघात होता होता बचावला. त्या ठिकाणी जवळच असणारे शहर अल्पसंख्यांक काँग्रेसचे पदाधिकारी चंद्रकांत उजागरे हे तात्काळ त्यांच्या मदतीला धावून गेले. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. थोड्याच वेळात त्या ठिकाणी निखिल वारे दाखल झाले. कार्यकर्त्याने संबंधित गाडी चालकाला तिथून बळजबरीने गाडी काढण्यासाठी भाग पाडले. गाडीची चावी घेतली आणि स्वतः गाडी चालवत तिथून गाडी काढून घेतली. यावेळी काँग्रेसचे उजागरे यांनी त्यावर आक्षेप घेतला. मात्र भाजप कार्यकर्त्याने तिथून पटकन पोबारा केला. 


यावेळी किरण काळे बोलताना म्हणाले की, सदर घटना ही अत्यंत गंभीर आहे. सुदैवाने अपघातग्रस्ताचे प्राण वाचले आहेत. एखादा दोन चाकी स्वार त्या ठिकाणी असता तर त्याचा जीव त्या ठिकाणी गेला असता. अशा पद्धतीने निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचे शिष्टमंडळ बुधवारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन तक्रार करणार आहेत. या भ्रष्टाचारामध्ये आणि निकृष्ट कामामध्ये कुणी कुणी टक्केवारी खाल्ली त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करण्याची मागणी काँग्रेस करणार असल्याचे काळे यांनी म्हटले आहे. 

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post